ताज्या घडामोडी

पत्रकार भारत कवितके यांची राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४ करीता निवड.

Spread the love

मुंबई मधील कांदिवली उपनगरातील जेष्ठ पत्रकार साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांंची साप्ताहिक धनगर शक्ती कडून उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४ करीता नुकतीच निवड करण्यात आली असल्याचे सा.धनगर शक्ती वृत्तपत्र/ युट्यूब चैनल चे संपादक आकाश पुजारी यांनी भारत कवितके यांना निवड पत्र देऊन कळविले आहे.शुक्रवार दिनांक २२ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सेलिब्रिशन बंक्वेट सभागृह, नविन बस स्टँड समोर, देहू फाटा, पुणे या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते राज्य स्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४ देऊन भारत कवितके यांना सन्मानित करण्यात येणार आहे.पत्रकारिता क्षेत्रात गेल्या काही वर्षांतील सातत्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल आम्ही सा.धनगर शक्ती वृत्तपत्र व युट्यूब चैनल कडून भारत कवितके यांना राज्य स्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४ जाहीर करण्यात आला असल्याचे संपादक आकाश पुजारी यांनी कळविले आहे.धनगर समाजातील मानबिंदू असलेल्या अरळी,ता.मंगळवेढा, जिल्हा सोलापूर येथून प्रकाशित होत असलेले भारत सरकार नोंदणीकृत असलेले धनगर शक्तीने प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मिडिया मध्ये आपला वेगळा ठसा उमटविला आहे.दोन सत्रात चालणाऱ्या या कार्यक्रमात पहिल्या सत्रात मान्यवरांचे हस्ते पुरस्कार मानकरींना पुरस्काराचे वितरण करण्यात येईल.तर दुसऱ्या सत्रात प्रिंट मीडिया मध्ये बातमी लेखनाचे सहा मुद्दे, हेडलाईन,सब हेडलाईन,चौकट बातमी, परिच्छेद यावर मार्गदर्शन केले जाईल.व इलेक्ट्रॉनिक मिडिया या मध्ये प्राथमिक माहिती, शुटिंग कसे करावे? ( कॅमेरा, मोबाईल), बातमी पूर्वी आपला परिचय कसा द्यावा? मुलाखत कशी घ्यावी, प्रश्न कसे काढावे? आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.पत्रकारिता क्षेत्रातील भरीव कामगिरी साठी भारत कवितके यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.भारत कवितके यांची आजवर पत्रकारिता, साहित्य व सामाजिक क्षेत्रातील विशेष कामगिरी बद्दल मिळालेल्या पुरस्कारांची संख्या १०४७ झाली असल्याचे भारत कवितके यांनी सांगितले आहे.कृतीशील, क्रियाशील, प्रामाणिक आणि पारदर्शक पत्रकारिता करुन भारत कवितके यांनी आजवर आपल्या लेखणीच्या माध्यमातून अनेक जटिल समस्या सोडविल्या आहेत.महानगर पालिका, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ च्या समस्या, झोपडपट्टी मधील समस्या, शासनाच्या विविध योजनांचा जनतेला मिळणारा लाभ, अनेक गोरगरिबांना आर्थिक शैक्षणिक लाभ मिळवून दिला.विशेष करून धनगर समाजा बाबत भारत कवितके यांनी सातत्याने लिखाण करून समाज जनजागृती निर्माण केली.फक्त बातमी लिहून न थांबता त्या बातमी करीता पाठपुरावा केला आणि समस्या सोडविल्या.भारत कवितके यांचे विविध वृत्तपत्रे युट्यूब चैनल संपादकांशी अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत.हा पुरस्कार जाहीर होताच विविध स्तरांतून भारत कवितके यांचे वर अभिनंदन व शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!