ताज्या घडामोडी

कासेगाव येथे जागतिक काचबिंदू सप्ताह साजरा.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

“जागतिक ग्राहक हक्क दिन, व राष्ट्रीय दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्या केंद्र कासेगाव(ता.वाळवा,जि.सांगली), जायंट्स ग्रुप ऑफ शिराळा हिरकणी व जागृत ग्राहकराजा सांगली जिल्हा यांचे मार्फत जागतिक काचबिंदू सप्ताह साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सर्व प्रथम नेत्र चिकित्सा अधिकारी सविता नलावडे यांनी काचबिंदू होऊ नये तसेच झाल्यानंतर डोळ्यांची काय काळजी घेतली पाहिजे तसेच डोळ्याचं आरोग्य कसे सांभाळायला हवे यांचे मार्गदर्शन केले.
यानंतर जागृत ग्राहकराजा संस्थेचे राज्य कार्यकारीणी सदस्य व सांगली जिल्हा पालक श्री.अनंत खोचरे यांनी जागतिक ग्राहकदिनाच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. आज बाजारात ग्राहकांना गंडा घालण्यासाठी पावलोपावली सर्व कंपन्यांची चढाओढ चाललेली आहे म्हणून ग्राहकांनी ‘गिऱ्हाईक’ न होता उघड्या डोळ्यांनी वावरणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.पूर्वीची असणारी आपली भारतीय परंपरा जपून निसर्गोपचाराचा आधार घेऊन आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमासाठी जागृत ग्राहकराजा संस्थेचे सांगली जिल्हा मुख्य संघटक श्री.राहुलदादा पाटील हे प्रमुख अतिथी होते.वाळवा तालुका ग्राहकराजा संस्थेचे पदाधिकारी श्री.जयदिप पाटील,श्री.प्रकाश पाटील गवारकर, सौ.स्वाती पाटील गवारकर,शिराळा हिरकणी अध्यक्षा व ग्राहकराजा शिराळा पदाधिकारी सौ.सरोजिनी कदम,हिरकणीच्या कार्यवाह सौ.रेश्मा पवार,प्रजापिता ब्रम्हाकुमारी कासेगावच्या विभुते दिदी,सर्व सेवाधारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!