ताज्या घडामोडी

शेतकरी विश्वनाथ चव्हाण यांनी उसाची ज्ञानेश्वर १६ ही जात संशोधनाने विकसित केल्याबद्दल अशोकराव ढगे यांनी केले कौतुक केले

Spread the love

नेवासा तालुक्यातील प्रगतशील शेतकरी विश्वनाथ चव्हाण यांनी उसामध्ये ज्ञानेश्वर १६ जात संशोधनाने व निवड पद्धतीने विकसित केले शेतकरी संशोधक झाल्याबद्दल त्यांचा सन्मान कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांनी केला भारत सरकारच्या वनस्पती नोंदणी कार्यालयामार्फत त्यांच्या या उसाच्या वाणाला मान्यता देण्यात आली आहे यासंदर्भात अधिक माहिती देताना संशोधक शेतकरी चव्हाण म्हणाली की ज्ञानेश्वर १६ उत्पादनामध्ये इतर वनापेक्षा सरस आहे अडस आली हंगामात सरासरी शेतकऱ्यांच्या शेतावर दीडशे टन प्रती एकर उत्पादन मिळाले आहे तर बारा महिन्यासाठी 100 टन प्रति एकरी सर्रास शेतकऱ्यांकडे उत्पादन विक्रम केला आहे हा ज्ञानेश्वर १६ उसाचा वाण पाण्याचे ताण सहन करू शकतो या पिकावर रोग व कीड बिलकुल येत नाही तसेच कोल्हापूर पुणे सातारा सांगली या जिल्ह्यामध्ये या वाणाचे बेणे शेतकरी घेऊन गेले आहेत त्यांना उत्पादनामध्ये क्रांतिकारक रिझल्ट मिळाले आहेत यापासून साखरेचा उताराही इतर सर्व जातीपेक्षा जास्त मिळाला आहे वय जास्त झाली तरी या वाणाला तुरा येत नाही
शेतकऱ्यांनी संशोधन करून उसाची नवीन जात निवड पद्धतीने शोधून काढली याचा मला अभिमान वाटतो असे गौरवोद्गार डॉक्टर ढगे यांनी काढले शेतकरी संशोधक अनेक पिकांमध्ये करत आहेत व शास्त्रज्ञा पेक्षा एक पाऊल पुढे टाकत आहेत किंवा अशा शेतकऱ्यांच्या वाणांचा अभ्यासासाठी जरूर विचार करावा असे त्यांनी कृषी विद्यापीठांना आवाहन केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!