ताज्या घडामोडी

न्यू इंग्लिश स्कूल सैतवडेच्या इयत्ता 5वीच्या चिमूरड्यांनी दिला भूतदयेचा हात

Spread the love

सोमवार दि.11/03/2024 रोजी शाळेच्या क्रीडांगणावर खेळताना घरट्यासह झाडावरून पडलेल्या काळी पाठ ,छाती पोटाकडे पिवळसर पांढरा रंग व सुगरणीच्या चोचीसारखी चोच असलेल्या पक्षाच्या छोट्या पिल्लाला वेदांत विकास देव्हारेने आयुष जाधवच्या मदतीने आपल्या वर्गात आणले. घरात आलेल्या नवीन पाहुण्याचे स्वागत करताना या वर्गातील विद्यार्थ्यांनी त्याला कुठे ठेवू नी कुठे नको असे करत, त्याचे खाणेपिणे,त्याच्या मनातील भीती घालविणे, वेदिका चादर या मुलीनं तर चक्क त्याला त्या घरट्यासह आपल्या घरी नेऊन पिल्लाच्या संपूर्ण पालकत्वाची जबाबदारी घेतली जणू ! दुसऱ्या दिवशी आईवडील तुटल्यामुळे भांबावलेल्या पिल्लाला घेऊन वेदिका शाळेत आली;आणि वर्गातील शमिका थुळ,भार्गवी थुळ, वेदिका चादर,वेदांत देव्हारे, सोहम कदम, असद सय्यद व आयुष जाधव यांच्या डोक्यात त्याला त्याचे आईवडील मिळवून देण्याचे विचारचक्र सुरू असताना पिल्लाने भरारी मारली आणि मी आता जरा सावरतोय असा जणू इशारा देत विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला. तरी त्याला अध्येमध्ये चारा पाणी देत, कापूस रुपी पॅंपर्स लावत, सूर्याच्या उन्हाची कोवळी किरणं देत असताना पिल्लाने ओरडायला सुरुवात केली. विद्यार्थ्यांच्या आणखी जिवात जीव आला. थोड्या वेळाने कानोसा घेतल्यावर बाहेरून तसेच प्रति आवाज विद्यार्थ्यांच्या कानावर पडू लागले, नी मुलांना आपले प्रयत्न सत्यात उतरत असल्याचा आनंद झाला. मग वर्गशिक्षकांच्या सल्ल्यानुसार पिल्लू आणि आईवडील यांच्या आतुरतेच्या भेटीचा क्षण आणण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या कुतूहलाने घरट्यासह पिल्लाला शाळेच्या व्हरांड्याच्या कट्ट्यावर ठेवलं आणि काय आश्चर्य बाळाच्या भेटीसाठी आसुसलेले आई बाबा तिथं आले त्यांचा आनंद गगनात कसा मावेल! तोंडभरून एकमेकांचे मुके-पापे झाले.पक्षांच्या घिरट्यांकडे बघताना विद्यार्थ्यांच्या मनात आणखी विचारचक्र सुरू झाले व पून्हा त्या पिल्लाला घरट्यासह अगदी सुरक्षितपणे जवळच्या झाडावर ठेवले.थोड्यावेळाने शिक्षकांसह सर्व विद्यार्थ्यांनी पक्षी निरीक्षणाच्या नजरेतून बघताना भरारी घेण्याचे छोटे छोटे धडे देत ते आईबाप आपल्या मुळच्या घरट्याचा त्याग करत आपल्या बाळाला नव विश्वात घेऊन गेले, आणि याही चिमूरड्यांनी सुटकेचा मोठा नि:श्वास सोडला.
शाळा, मुख्याध्यापक,शिक्षक, संस्था,पालक व संपूर्ण समाज अशाच संवेदनशील पिढीच्या प्रतिक्षेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!