ताज्या घडामोडी

सांगली जिल्हा विकास संघाचा चेंबूरमध्ये द्राक्ष व फळ महोत्सव

Spread the love

मुंबई- सांगली जिल्ह्यातील शेतकर्‍यांना आपला शेतीमाल थेट मुंबईसारख्या शहरात ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संधी उपलब्ध झाली आहे. त्यासाठी सांगली जिल्हा विकास संघ आणि मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने चेंबूरमध्ये द्राक्ष व फळ महोत्सव सुरू झाला आहे.

सांगली जिल्हा विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष संभाजी लोखंडे यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या द्राक्ष व फळ महोत्सवाचे यंदाचे ६ वे वर्ष आहे.हा महोत्सव चेंबूर पालिका एम पश्चिम विभाग कार्यालयासमोर सुरू असून तो १० मार्चपर्यंत चालणार आहे. या महोत्सवाला पालिकेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांसह विविध राजकीय पक्षांचे नेते, संघटनांचे पदाधिकारी आणि अनेक मराठी कलाकार मंडळी भेट देत आहेत. याठिकाणी सांगली जिल्ह्यातील विविध प्रकारची द्राक्षे,फळे अणि महिला बचत गटाचे घरगुती पदार्थ रास्त दरात विक्रीसाठी ठेवले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!