ताज्या घडामोडी

पुणे येथील कौटुंबिक न्यायालयात लोक अदालतीचे आयोजन

Spread the love

आज दिनांक ३/३/२०२४ रोजी पुणे येथील कौटुंबिक न्यायालयात लोक अदालतीचे आयोजन केले होते. दररोज वादावादी आणि नकारात्मकता या ऐवजी आज भविष्याचा विचार करून पक्षकारांनी भात सोडवण्या कामी आयोजित केलेल्या लोक अदालतीस चांगला प्रतिसाद दिला. प्रिन्सिपल जज काळे साहेब यांनी सदर लोकं अदालतीमध्ये प्रकरणांचा निपटारा होण्यासाठी प्रयत्न केले. अनेक प्रकरणांमध्ये पक्षकारांना समजावून त्यांना एकमेकांबरोबर राहण्यासाठी उद्युक्त केले गेले. कोर्ट क्रमांक चार आणि सहा मधील प्रकरणे पॅनल क्रमांक दोन समोर ठेवण्यात आली होती. सदर पॅनल समोर निवृत्त न्यायाधीश डी.डी जोशी साहेब तसेच पॅनल विधीज्ञ म्हणून एडवोकेट अनिशा फणसळकर यांनी कामकाज पाहिले. त्यामध्ये आज रोजी दहा प्रकरणांमध्ये पती-पत्नी एकमेकांसह गुण्यागोविंदाने राहावयास गेले तसेच इतर आठ प्रकरणे देखील मार्गी लागली. या कामी कोर्टाचा स्टाफ यांनी देखील मोलाचे सहकार्य केले. जास्तीत जास्त प्रकरणे या पॅनल समोर यशस्वी झाली याचा आनंद आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!