ताज्या घडामोडी

गण गण गणात बोते’ नामाच्या गजरात श्री. गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळा आंधळी येथे उत्साहात साजरा..

Spread the love

गण गण गणात बोते’ नामाच्या गजरात गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळा उत्साहात साजरा करण्याचा आला.सालाबाद प्रमाणे गजानन महाराज प्रकट दिन सोहळा श्री गजानन महाराज मंदिर, आंधळी फाट्याजवळ आंधळी येथे मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. त्यानिमित्ताने पलूस ते आंधळी फाटा गजानन महाराज मंदिर पर्यंत नाम साधना पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी नाम साधना पायी दिंडी सोहळ्यास सुरुवात झाली यावेळी परिसरातील सर्व भाविक भक्त सहभागी झाले होते.धोंडीराज महाराज समाधी मंदिर व्यवस्थापक कुमार पाटील , वारकरी ग्रामस्थ सर्व सहकारी सहभागी झाले होते.

सर्वांसाठी भजन कीर्तन, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते पलूस आंधळी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला संयोजन व्यवस्थापक लालासो शिंदे, ओम शिंदे व गजानन महाराज मंदिर आंधळी, सद्गुरु श्री धोंडीराज महाराज हरिपाठ मंडळ पलूस यांनी केले ‘गण गण गणात बोते’ नामाचा गजर, अभिषेक, पालखी, पारायण अशा धार्मिक वातावरणात प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!