ताज्या घडामोडी

स्व’.उत्तमराव गोरे माजी सरपंच स्मरणार्थ फिरते वाचनालयास 40 पुस्तके सस्नेह भेट

Spread the love

नेवासा तालुक्यातील जळके खुर्द  फिरते मोफत वाचनालय:::पुस्तक आपल्या भेटीला हा कार्यक्रम पार पडला शब्दगंध साहित्यिक परिषद शाखा नेवासा यांच्या वतीने तालुक्यामध्ये वाचनालय चळवळ उभी करण्यात आली आहे याचे मार्गदर्शन माजी कुलगुरू डॉक्टर अशोकराव ढगे करत असून उपक्रमासाठी प्राचार्य डॉक्टर किशोर धनवटे उपाध्यक्ष दिगंबर गोंधळी तसेच कार्यकारी अध्यक्ष पांडुरंग रोडगे परिश्रम घेत आहेत अनेक गावात कार्यक्रम झाले असून मोठ्या प्रमाणात वाचक जोडले जात आहेत हा कार्यक्रम नेवासा तालुक्यात दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे जळके खुर्द येथील स्वर्गीय उत्तमराव गोरे सरपंच यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू नामदेवराव गोरे यांनी 32 पुस्तके फिरती वाचनालयास सस्नेह भेट दिले याप्रसंगी जळके खुर्द ची माजी सरपंच विठ्ठलराव परदेशी व ग्रामस्थ उपस्थित होते या पुस्तकांचा स्वीकार प्राचार्य डॉक्टर धनवटेयांनी केला माजी कुलगुरू डॉ अशोकराव ढगेयांनी फिरते मोफत वाचनालयास पुस्तके सस्नेह भेट दिल्याबद्दल नामदेवराव गोरे यांचे ऋणनिर्देश व्यक्त केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!