ताज्या घडामोडी

दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल मध्ये जागतिक विज्ञान दिवस निमित्त भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

Spread the love

परळी (प्रतिनिधी) नोबेल पारितोषिक विजेते सी. व्ही.रमण यांच्या जयंती निमित्त दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान दिनी प्रशालेत भव्य विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले.
यावेळी पहिलीपासून ते दहावीपर्यंतच्या अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद दिला. यामध्ये विद्यार्थ्यांनी चार्ट मेकींग, नाॅन वर्किंग व वर्किंग माॅडेल द्वारे त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन मांडला.

सदर स्पर्धेत यश मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे प्राचार्य श्री.विठ्ठल तुपे सर आणि प्रशालेचे डायरेक्टर श्री.श्रीकांत पाटील सर यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
आमच्या प्रशालेच्या वतीने वेळोवेळी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते . जेणे की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण , नैतिक मूल्यांचा विकास साधला जाईल. विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन ,चिकित्सक गुण वृद्धिंगत व्हावा तसेच कल्पनाशक्तीला प्रत्यक्षात उतरवण्याची संधी मिळावी यासाठी आम्ही निरंतर प्रयत्न करत असतो.
विज्ञान प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या तसेच विजेत्या सर्व विद्यार्थ्यांचे विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ. उषा किरण गित्ते तसेच आमचे नेहमीच मार्गदर्शक ठरलेले श्री किरण गित्ते साहेब यांनी अभिनंदन केले आहे. यावेळी सर्व विषय शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले तसेच सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे योगदान लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!