ताज्या घडामोडी

कामेरी येथे दहा मार्च रोजी तिसरे मातृ स्मृती ग्रामीण साहित्य संमेलन

Spread the love

इस्लामपूर दि 1(प्रतिनिधी)
कामेरी तालुका वाळवा येथे श्री कामेश्वरी साहित्य मंडळ व स्वा. सैनिक बाळकृष्ण पाटील सामाजिक संस्था यांच्या वतीने रविवार 10 मार्च रोजी तिसरे मातृ स्मृति ग्रामीण साहित्य संमेलन होणार आहे
अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष कादंबरीकार दि. बा. पाटील यांनी दिलीप्रा. डॉ. मिलिंद जोशी कार्याध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या अध्यक्षतेखाली हे साहित्य संमेलन होणार असून या संमेलनाचे उद्घाटन मंगळवेढा येथील शास्त्रज्ञ प्रा डॉ सुभाष कदम यांच्या हस्ते होणार असून यावेळी प्रा. चंद्रकुमार नलगे प्रा. शामराव पाटील अण्णा ऍड बी. एस. पाटील अण्णा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर प्रा चंद्रशेखर कांबळे प्रा. वि. द कदम कथाकार आप्पासाहेब खोत, डॉ. श्रीकांत पाटील, धनाजी घोरपडे आयुर्वेदाचार्य बाबू पांडकर – सासवड हे उपस्थित राहणार आहे या संमेलनात 2023 सालातील राज्यस्तरीय मातृ स्मृती साहित्य पुरस्कार महाराष्ट्र गोवा व कर्नाटक सीमा भागातील मान्यवर साहित्यिकांच्या साहित्यकृतींना प्रदान करण्यात येणार असून त्यामध्ये गोवा येथील ज्येष्ठ साहित्यिक श्री. विठ्ठल गावस व चंद्रकांत गावस यांना जीवनगौरव तर गजानन देसाई यांचे दवबिंदू हे ललित गद्य बेळगाव जिल्ह्यातील प्रा. प्रकाश काशीद संचित, प्राचार्य डॉ. विनोद गायकवाड, मिडल क्लास सखाराम कांबळे माझा जीवन प्रवास, पुणे येथील देवा झिंजाड, एक भाकर तीन चुली, अमरावतीचे प्रा. डॉ. प्रमोद गारोडे संत जनाबाई अभंग गाथा जुन्नर शिवाजी चाळक कोरड्या घशाचा ताळेबंद हरिश्चंद्र पाटील टेंभुर्णी सोलापूर यांच्या ओवाळणी आणि संपत पार्लेकर यांच्या कहानी एका सोंगाड्याची या ग्रंथांची निवड करण्यात आली असून संबंधित लेखकांना रोख रक्कम सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन संमेलनामध्ये गौरविण्यात येणार आहे हे संमेलन तीन सत्रात होणार असून दुसऱ्या सत्रात राजकारणातील मूल्य हरवत चालली आहेत काय या विषयावर प्रा डॉ संजय थोरात यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून त्यामध्ये प्रा डॉ विजय गायकवाड व प्रमोद गारो डे सहभागी होणार आहेत तिसऱ्या सत्रात अभिजीत पाटील सांगली यांचे अध्यक्षतेखाली कवी संमेलन होणार आहे. सूत्रसंचालन कवी रमजान मुल्ला हे करणार आहेत कवी संमेलन हे निमंत्रितांच्यासाठी आणि खुले संमेलनही होणार आहे अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष दि. बा. पाटील यांनी दिली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!