ताज्या घडामोडी

ज्यांना हत्तीच्या पायाखाली दिले त्यांच्याच वंशजानी संभाजी राजांना बदनाम केले प्रा. अरुण घोडके यांचे प्रतिपादन

Spread the love

जयकिसान व्याख्यानमाला – पुष्प पहिले

येडेनिपाणी दिनांक 2 :-
छत्रपती शिवाजी महाराज प्रेमविर नव्हे तर धर्मवीर आणि स्वराज्य रक्षक होते. परंतु बखरकार चिटणीसाचे खापर पणजोबा बाळाजी आवजी चिटणीस याला सांभाजी राजांनी कटात सामील झाल्याच्या कारणावरून हत्तीच्या पायाखाली देवून मारले याचा बदला म्हणून 122 वर्षानी चिटणीसाने आपल्या बखरीतून संभाजी राजांचे चरित्र बदनाम केल्याची माहिती इतिहास संशोधक आणि शिवव्याख्याते प्रा. अरुण घोडके यांनी केले. येडेनिपाणी ता. वाळवा येथे जयकिसान मंडळाच्या वतीने आयोजित पद्मभूषण वसंतदादा पाटील स्मृती व्याख्यानमालेमध्ये पहिले व्याख्यान पुष्प गुंफताना बोलत होते. अध्यक्ष स्थानी जि. प. चे माजी अध्यक्ष देवराज पाटील होते. व्याख्यानमालेच्या 35 व्या वर्षाचा उद्घाटन समारंभ सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजित देशमुख यांच्या शुभहस्ते झाला. यावेळी सांगली जिल्हा कॉँग्रेस चे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, संस्थापक आनंदराव पाटील, सरपंच शामबाल माळी उपसरपंच प्रताप पाटील डॉ. सचिन पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा. घोडके यांनी छत्रपती संभाजी राजांचा इतिहास सांगताना म्हणाले कि संभाजी राजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे चिरंजीव होते आणि शिवाजी राजांच्या पेक्षा सरस होते. छत्रपतींच्या तालमित तयार झालेले संभाजी राजे हे अतिशय बुद्धिमान, सतशील आणि ताकदवान होते. स्वराज्याच्या 9 वर्षाच्या कालावधीत संभाजीराजनाई 128 लढाया केल्या त्यामध्ये एकदाही ते पराजित झाले नाहीत. या काळात औरंगजेबाला एकही किल्ला जिंकता आला नाही. अशा धर्मरक्षक सांभाजीराजना औरंगजेबाने माराठ्यांच्यातील फितुरांच्या साथीने मारले संभाजीराजांचा इतिहास हा सर्वाना प्रेरणा देणारा आहे. त्याचे पारायण व्हायला हवे आणि आजच्या तरुणांनी तो जपायला हवा. उद्घाटक सत्यजित देशमुख यांनी जयकिसान मंडळाच्या या 35 वर्षाच्या उपक्रमाचे कौतुक करताना ही व्याख्यानमाला महाराष्ट्रातील सांस्कृतिक चळवळीला दिशा देणारी व्याख्यानमाला असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी जयकीसान मंडळाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागामध्ये निवड झालेल्या तरुण तरुणींचा सत्कार करण्यात आला. यामध्ये सागर पाटील, सागर माळी, प्रज्ञा पाटील, तेजस्विनी गुरव, रोहित पाटील, निलेश कोरे, अमित पाटील यांच्या सहकुटुंब सत्कार करण्यात आला. यावेळी परिसरातील अनेक मान्यवर आणि श्रोते उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन विजायकुमार पाटील, प्रा. स्वप्नील पाटील, कालिदास पाटील, सचिन शेवाळे, शिवानंद माळी, बाळकृष्ण पाटील, प्रा. राजेंद्र पाटील यांनी केले. यावेळी सुरूल चे सरपंच शंकर चव्हाण, , राजाराम पाटील, उत्तमराव पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. दिपक स्वामी तर आभार अजिंक्य पाटील यांनी मानले.जायकीसान मंडळाच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील स्मृती व्याख्यानमाले च्या पहिल्या व्याख्यान पुष्प प्रसंगी बोलताना प्रा. अरुण घोडके.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!