ताज्या घडामोडी

यशवंत ग्लुकोज कारखान्यात नवीन उपपदार्थांची निर्मिती व लागणारी वीज पन्नास टक्यापर्यंत निर्मितीचे उद्दीष्ट – माजी मंत्री शिवाजीराव नाईक

Spread the love

शिराळा प्रतिनिधी
सिध्देश्वरनगर ता. शिराळा येथे कारखाना कार्य स्थळावर यशवंत सहकारी ग्लुकोज कारखान्याच्या विशेष साधारण सभेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना शिवाजीराव नाईक म्हणाले, येणाऱ्या काळात सर्व संस्था पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होतील. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन क्षमता वाढवून ती अधिक सुलभ करण्याचा आमचा प्रयत्न राहील. मक्याला चांगली किमंत मिळत आहे. शेतकऱ्यांनी मका लागवड करावी याकरिता योजना राबविण्याचा आमचा मानस आहे. समाजकारण करत असताना अडचणी येतात त्या समन्वयातून सोडविण्यावर भर राहील. अडचणीच्या काळात आपल्या सगळ्यांची साथ सोबत राहिली ती चांगल्या काळात देखील कायम ठेवूया.
कारखान्याचे चेअरमन रणधीर नाईक म्हणाले, कच्चा माल आणि बाजार पेठेतील परिस्थितीमुळे काही काळ ग्लुकोज कारखाना बंद ठेवावा लागला. आता परिस्थिती सुधारली आहे. मका उपलब्ध होऊ लागला आहे. मक्यापासून उत्पादित होणाऱ्या मालाला चांगली मागणी आहे. त्यामुळे काही नवीन गोष्टी अंतर्भूत करून कारखाना आता सुयोग्य नियोजनाने सुरू आहे. हाय मलटो सिरप (द्रवरूप साखर), डेक्टोस सिरप, मालटो डेक्टिंग (बारीक पावडर) सारखे नवीन पदार्थ निर्मिती १५ दिवसात सुरू करणार आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून वीजनिर्मिती देखील नव्याने सुरू करून पन्नास टक्यापर्यंत वीज निर्मितीचे उद्दिष्ट आहे. भविष्यात नाविण्याला कल्पकतेची जोड देऊन बांधणी करण्यात येईल. आपल्या संस्था बंद असताना देखील सर्वांनी सहकार्य केले त्याबद्दल धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच आहेत.
प्रारंभी पसायदान कु. सहेली मुलाणी, मिलिंद जोशी यांनी गायले, सुखदेव पाटील, सी. एच. पाटील, प्रकाश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मका पुरवठा करणारे संजय सिसोदिया, मोहन मुंदडा, हरिष मुंदडा, कृपाल गिडवाणी, शंकर सोनटक्के, प्रताप दिलवाले यांचा सत्कार करण्यात आला.
आनंदराव पाटील, वारणा साखर कारखान्याचे संचालक विजय पाटील, वारणा बँकेचे संचालक अरविंद बुद्रुक, वारणा दूध संघाचे संचालक व्ही. टी. पाटील, सतीश पाटील, एम. एस. कुंभार, शहाजी पाटील, एम. के. जाधव, गजानन घोडे, अर्जुन पाटील, राजन पाटील, संभाजी पाटील, मोहन पाटील, विजय मुळीक, मदन पाटील, वसंत पाटील, आनंदराव शेवडे, संभाजीराव मोहिते, महेश पाटील, के. वाय. भाष्टे, पांडुरंग गायकवाड यांच्यासह शिराळा वाळवा तालुक्यातील सभासद, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!