ताज्या घडामोडी

विचारांची उंची वाढवतात पुस्तके-डॉ .अशोकराव ढगे

Spread the love

प्रत्येक व्यक्तीला पुस्तक वाचण्याची सवय असली पाहिजे कारण पुस्तके माणसाच्या विचारांची उंची . वाढवतात . पुस्तक वाचनातून विविध विषयांचे ज्ञान तर होतेच ,त्याचबरोबर आपल्यावर विविध संस्कार करण्याचे काम पुस्तके करत असतात .यासाठी पुस्तक वाचण्याची सवय गरजेची असल्याचे मत माजी प्राचार्य व कुलगुरू डॉ . अशोकराव ढगे यांनी व्यक्त केले . शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य नेवासा शाखचा फिरते मोफत वाचनालय हा उपक्रम तालुक्यातील गोंडेगाव येथिल हनुमान माध्यमिक विद्यालयात घेण्यात आला याप्रसंगी डॉक्टर ढगे बोलत होते . अध्यक्षस्थानी शाळेच्या व्यवस्थापन समितिचे प्रमुख श्री संतोष गारुडे होते . कार्यक्रममचे प्रास्ताविक शब्दगंध नेवासा शाखेचे सदस्य श्री पांडुरंग रोडगे यांनी तर उपस्थितांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक श्री संदिप फुलारी यांनी केले . शब्दगंधचे श्री दिगंबर गोधंळी यांनी शेवटी आभार प्रदर्शन केले . या प्रसंगी शब्दगंध साहित्यिक परिषद नेवासा शाखेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ . किशोर धनवटे म्हणाले की वाचनातून विचार प्रगल्भ होतात तसेच वाचन हे एक व्यसनमुक्तीचे प्रभावी साधन असल्याने आपल्या गावातील लोकांनी पुस्तके वाचावीत यासाठी शब्दगंधाचे हे फिरते मोफत वाचनालय आज आपल्या गावात आले असून त्याचा ग्रामस्थांनी फायदा घेण्याचे आवाहन त्यांनी केले .
याप्रसंगी गावातील संतोष शिरसाठ ,छबुराव वाघमारे , गोरक्षनाथ गारुडे , राजेंद्र सुसे , बबन सुसे , राजेंद्र शिरसाठ , रमेश जामकर , विजय वाघुले , अशोक नवघरे ,दत्तात्रय शेजुळ , बापूसाहेब गायकवाड , देवेंद्र वाघुले , संदीप फुलारी, गोरक्षनाथ नवले , मारुती धाडगे , कैलास वाघोले ,संतोष गारुडे ,पांडुरंग रोडगे , अण्णासाहेब वाघोले , बाबासाहेब रोडगे इत्यादी ग्रामस्थ , शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!