कृषीवार्ता

एक रकमी एफ आर पी द्यावी, दोन टप्प्यात एफ आर पी देण्याचा कायदा रद्द करावा, वजन काटे ऑनलाईन करावेत , तोडणी मजूर महामंडळ करावे यासाठी सांगली जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन करण्यात येणार

Spread the love

सांगली…

एक रकमी एफ आर पी द्यावी, दोन टप्प्यात एफ आर पी देण्याचा कायदा रद्द करावा, वजन काटे ऑनलाईन करावेत , तोडणी मजूर महामंडळ करावे यासाठी सांगली जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली .

 

खराडे म्हणाले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी राज्य व्यापी चक्का जाम ची हाक दिली आहे एक रकमी एफ आर पी द्यावी, दोन टप्प्यात एफ आर पी देण्याचा केलेला कायदा रद्द करा, संगणकीकृत ऑनलाईन वजन काटे करा, ऊस तोडणी मजुरसाठी गोपीनाथ मुंडे महामंडळ तयार करा, ऊस वाहतूक दाराणा गंडा घालणाऱ्या मजुराचा शोध घेण्यासाठी राज्य व्यापी पोलीस पथक तयार करा, साखरेची किंमत 35 रुपये करा, इथेनॉल चे भाव 65 रुपये, तोडणीसाठी पैसे मागणाऱ्या वर कारवाई करण्यासाठी नवा कायदा करा, रिकवरी चोरी थांबवा आदी मागण्यासाठी गेल्या आठवड्यात दोन दिवस तोडी बंद ठेवून आंदोलन करण्यात आले मात्र राज्य सरकार आणि साखर कारखानदार यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही त्यामुळेच पुन्हा सांगली जिल्ह्यात इस्लामपूर रस्त्यावर लक्ष्मी फाटा, इस्लामपूर, शिराळा, तासगाव , कडेगांव,पलूस, वसगडे ,जत, विटा, कवठेमहांकाळ, म्हैशाल उड्डाण पूल आदी ठिकाणी रस्ता रोको होणार आहे हे आंदोलन सर्वत्र सकाळी दहा वाजता सुरू होईल तरी सर्व ऊस उत्पादकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होवून आंदोलन यशस्वी करावे या आंदोलनाची तयारी पोपट मोरे संदीप राजोबा संजय बेले भागवत जाधव जगनाथ भोसले अड शमसुद्दून संदे राम पाटील राजेंद्र माने बाळासाहेब जाधव शिवाजी पाटील दामाजी डू बल रमेश माळी अड सुरेश घागरे तानाजी धनवडे आदी करत आहेत
बाइट.. महेश खराडे स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!