कृषीवार्ता

शेतकरी, ऊस वाहतूकदार ,मजूर आणि साखर कारखानदारांच्या मागण्यासाठी पुकारण्यात आलेल्या ऊस तोड बंद, ऊस वाहतूक बंद आंदोलनाला उस्फुर्त प्रतिसाद

Spread the love

सांगली/ प्रतिनिधी
शेतकरी, ऊस वाहतूकदार ,मजूर आणि साखर कारखानदारांच्या मागण्यासाठी पुकारण्यात आलेल्या ऊस तोड बंद, ऊस वाहतूक बंद आंदोलनाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला 100 टक्के बंद यशस्वी झाला उद्या शुक्रवारी रस्त्यावर वाहन दिसले तर पेटवले जाईल असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला
जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली उदगिरी, विराज, क्रांती, सोन हिरा कारखान्यास ह गावोगावी मोटरसायकल रॅली काढण्यात आली ज्या ठिकाणी तोडी सुरू होत्या त्या बंद पाडण्यात आल्या तर काही तुरळक ऊसाची वाहतूक सुरू होती त्या वाहनाची हवा सोडण्यात आल्या दत्त इंडिया क्या कुमठे परिसरात हवा सोडण्यात आली तर उदगीरीला जाणाऱ्या तीन ट्रॅक्टरची बामणी येथे हवा सोडण्यात आल्या क्रांतीला जाणाऱ्या दोन ट्रॅक्टर ची बलवडी येथे वाहने पंक्चर करण्यात आली याशिवाय उदगीरी, विराज, क्रांती आणि सोन हिरा साखर कारखान्याच्या प्रशासनाला शुक्रवारीही संपूर्ण ऊस तोड आणि ऊस वाहतूक बंद झाली पाहिजे वाहने रस्त्यावर दिसली तर पेटविली जातील असा इशारा खराडे यांनी दिला
दरम्यान जुन्या कराड रस्त्यावर कडेगाव पाचवा मैल रस्त्यावर राजेंद्र माने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले सोन हिरा आणि क्रांतीला जाणारी 15 ते 20 वाहने रोखण्यात आली
दरम्यान बावची फाट्यावर भागवत जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले हुता त्मा आणि राजाराम बापू करखण्याला जाणाऱ्या वाहनाची हवा सोडण्यात आली वसगडे येथे संदीप राजोबा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले तर मिरज तालुक्यात संजय बेले भरत चौगुले संजय खोलखुंबे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन करण्यात आले
आंदोलकांसमोर बोलताना महेश खराडे म्हणाले आंदोलन केवळ एक रकमी एफ आर पी, मिळावी, तीन टप्प्यात एफ आर पी देण्याचा कायदा रद्द करावा, ऑनलाईन वजन काटे करावेत, तोडायला द्यावे लागणारे पैसे बंद व्हावेत यासाठी नाही तर ऊस तोडणी मजुरांसाठी तोडणी महामंडळ व्हावे , गंडा घालणाऱ्या मजुराचा शोध घेण्यासाठी राज्य व्यापी पोलीस पथक नियुक्त करावे साखरेचा भाव 35 रुपये करावा, इथेनॉल चा भाव 65 रुपये करावा आदी मागण्या साठी करण्यात आले आहे शुक्रवारी ही हुतात्मा राजाराम बापू कारखान्यावर रॅली काढण्यात येईल त्याला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन खराडे यांनी केले या आंदोलनात अनिल पाटील चंद्रकांत पाटील धोंडीराम पाटील जितेंद्र पाटील शाम पवार महादेव पवार निशिकांत पोतदार शांताराम पाटील हणमंत पाटील अशोक पाटील सुभाष पाटील युवराज पाटील सिकंदर शिकलगार अमित रावतले आशिष पाटील हणमंत पाटील रोहित भोसले दत्ता जाधव अनिल जाधव पंढरीनाथ जाधव जगग्नाथ भोसले प्रताप पाटील बाळासाहेब जाधव अजमुद्दिन मुजावर राजेंद्र पाटील राम पाटील मानसिंग पाटील अस्लेश गाढवे बाबुराव शिंदे अड दिपक लाड महेंद्र रसाळ दिपक पाटील आदीसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!