कृषीवार्ता

यशवंत ग्लुकोज कारखान्याची उत्पादन प्रक्रिया पूर्ण क्षमतेने लवकरच सुरू होणार – रणधीर नाईक

Spread the love

शिराळा प्रतिनिधी
यशवंत सहकारी ग्लुकोज कारखान्याची उत्पादन प्रक्रिया पुनश्य सुरू होत असून त्यासाठी लागणारा कच्च्या माल मक्याची आवक सुरू केली आहे लवकरच कारखाना पूर्ण क्षमतेने पूर्वत सुरू होऊन शिराळा व वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे प्रतिपादन यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष रणधीर नाईक यांनी केले.
ग्लुकोज कारखान्यासाठी लागणाऱ्या मक्याच्या पहिल्या पाच गाडीचे पुजन कारखाना कार्यस्थळावरती झाले त्या वेळी ते बोलत होते. नाईक पुढे म्हणाले, कारखान्याची उत्पादन प्रक्रिया पुनश्च चालू करण्यासाठी व कारखान्याच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी त्याचबरोबर काही नवीन उत्पादन घेणेसाठी नव्याने मशनरी बसवण्यात अली आहे . हे सर्व काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्याचबरोबर कारखान्याचा वीजपुरवठा सुरळीत सुरळीत करण्याचे काम गतीने सुरू आहे. कारखान्याला लागणारा कच्चा माल मक्याची खरेदी सुरू करण्यात आली असून लवकरच कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू होऊन शिराळा वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे अशी माहिती नाईक यांनी दिली.
यावेळी ग्लुकोज कारखान्याचे उपाध्यक्ष मा.आनंदराव पाटील, टेक्निकल डायरेक्टर अभिजित नाईक , ग्लुकोजचे संचालक सुखदेव पाटील, एम एस कुंभार, रघुनाथ पाटील, प्रकाश पाटील ,अर्जुन पाटील युवराज यादव ,प्रतापराव जाधव, शहाजी पाटील,रामचंद्र (गुंडा) पवार, एन डी लोहार , राजन पाटील , सागर नाईक, जनरल मॅनेजर दलजीत सिंह राणा ,अधिकारी प्रसाद मोकाशी, विलास चौगुले, नारायण पाटील,के एम पाटील, विश्वास पाटील, गोरख पवार, दादा सूर्यवंशी व विविध खात्यांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!