ताज्या घडामोडी

महिला राष्ट्रवादी संघटनेतर्फे नगरसेविका श्रीमती सुनिता संभाजी सपकाळ यांच्या विशेष पुढाकाराने हळदी कुंकू उत्साहात संपन्न

Spread the love

इस्लामपूर येथील प्रभाग १३ मध्ये श्रीमती सुनिता संभाजी सपकाळ यांनी महिला राष्ट्रवादी संघटनेच्या वतीने महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात स्वप्नातील इस्लांपूर कसे असावे याबाबत अनेक महिलांनी आपली मते मांडली.याबरोबरच लघु उद्योग, सिटी बस,पे टॉयलेट,सिग्नल या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत असे मत व्यक्त केले.

यावेळी सुरेखा सपकाळ, आशाराणी पाटील, अनिता पाटील, संगिता कांबळे, रोझा किणीकर,पंडित मँडम,कमलाताई पाटील,मंगल मलगुंडे व राष्ट्रवादी च्या महिला पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!