ताज्या घडामोडी

शिराळा तालुका काँग्रेस कमिटीची तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

भारतीय सांसद हि देशाची सर्वोच्च संस्था आहे. हिवाळी अधिवेशन सुरु असताना सांसद भवनाची सुरक्षा भेदून दोन तरुणांनी हल्ला केला हि घटना राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय धोक्याची असल्याने त्या संदर्भात मा.गृहमंत्र्यांनी स्पष्ट निवेदन करावेशी मागणी करणाऱ्या 142 खासदारांचे भाजप सरकारने निलंबन केले आहे. इंडिया आघाडीच्या घटक पक्षांच्या वतीने नवी दिल्ली येथे या घटनेचा कडाडून विरोध केलाच आहे परंतु केंद्राकडून होत असलेल्या लोकशाहीच्या गळचेपीबाबत भाजप सरकारच्या विरोधात शिराळा तहसीलदार कार्यालयासमोर निषेधाची निदर्शने करण्यात आली.
यावेळी तालुका उपाध्यक्ष श्री राम तात्या नाईक,श्री पोपट कदम,ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते श्री तुकाराम चव्हाण,सचिव श्री सुनील घोलप,श्री मधुकर यटम,श्री शिवाजी हुजरे,श्री संदीप बागडे तसेच इतर अनेक काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!