ताज्या घडामोडी

युवासेना ऑनलाईन प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानास मुरुममध्ये प्रारंभ

Spread the love

मुरूम, ता. उमरगा १८ (प्रतिनिधी)

युवासेना प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मुरूम शहरात सोमवारी (ता. १८) रोजी युवासेना ऑनलाईन प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान २०२२ युवासेना सचिव वरुन सरदेसाई, युवानेते किरण गायकवाड, विभागीय सचिव अक्षय ढोबळे, विधानसभा संघटक शरद पवार, तालुका प्रमुख अजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर युवासेनेच्या वतीने शहरातील महात्मा बसवेश्वर चौकात सोमवारी (ता. १८) रोजी या अभियानाला सुरुवात करण्यात आली. या अभियानाचा शुभारंभ दत्ता आण्णा हुळमजगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रसाद मुदकण्णा, युवासेना शहर प्रमुख प्रल्हाद (भगत) माळी, युवासेना उपशहर प्रमुख विशाल मोहिते, मिडिया प्रमुख जगदीश निंबर्गे, प्रविण बिराजदार, प्रशांत गुरव, सचिन धुम्मा, जयसिंह खंडागळे, सुर्या जाधव, गणेश डोंगरे, सागर खंडागळे आदी युवासेना पदाधिकारी उपस्थित होते. शहरातून अतिशय चांगला प्रतिसाद युवक देत आहेत. परिसरातील युवकांनी या युवासेनेचे सदस्य होवून युवासेना संघटना वाढविण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन युवासेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!