ताज्या घडामोडी

वसंत कॉलेज ऑफ एज्युकेशन,इस्लामपूर येथे टी.इ.टी, सि.टी. इ. टी व टी. ए. आय .टी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

Spread the love

इस्लामपूर दि 7(प्रतिनिधी)
वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटीच्या वसंत कॉलेज ऑफ एज्युकेशन,इस्लामपूर येथे टी.इ.टी, सि.टी. इ. टी व टी. ए. आय .टी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली व पवित्र पोर्टल मधून शिक्षकपदी नियुक्त झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसचिव अॅड. धैर्यशील पाटील होते.यावेळी या कार्यशाळेमध्ये प्रमुख वक्ते प्रा.कृष्णा रोकडे यांनी विद्यार्थ्यांना TET/CTET & TAIT च्या संदर्भात मार्गदर्शन केले. त्यांनी वरील सर्व परीक्षा पास होण्याचे निकष समजावून सांगितले तसेच TAIT ची तयारी कशी करावी, त्याच बरोबर SET परीक्षेसंदर्भातही मार्गदर्शन केले. अॅड. धैर्यशील पाटील यांनी पवित्र पोर्टल मधून शिक्षकपदी निवड झालेल्या ऋषीकेश मोरे, अभिजीत माने, स्वप्नाली माने, गौरी पाटील, रोहीत दाभोळे, पूजा वांडरे, प्रियांका पाटील, ऋषीकेश पाटील इतर १४ विद्यार्थ्यांचा सत्कार केला व प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांशी संवाद साधला
या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. सौ. एस. ए. पाटील यांनी काम पाहिले. या कार्यक्रमात कॉलेजचे प्राचार्य डॉ. ए. एम. पाटील यांनी प्रास्ताविकि केले. या कार्यशाळेस वसंत कॉलेज ऑफ एज्युकेशन, इस्लामपूर चे प्रा. सुरेश जाधव, डॉ. सोपान खाडे, प्रा. सुलभा पाटील, शशांक यादव,. श्रीनिवास चिवटे, सुरेश शिंदे, व अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ एज्युकेशन, आष्टा कॉलेजच्या प्रा. सुर्वे मॅडम, श्री. शिवाजीराव देशमुख शिक्षणशास्त्र महाविद्यालय, रेड-शिराळा कॉलेजचे प्राचार्य. व्ही. आर. चव्हाण सर, प्रा. टी.जी. पाटील सर व वरील कॉलेज चे संबंधित छात्राध्यापक उपस्थित होते. शेवटी प्रा. डॉ. एस.जी. खाडे सर यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!