ताज्या घडामोडी

बसवराज पाटील यांचे आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडून जंगी स्वागत

Spread the love

मुरूम, ता. उमरगा, ता. २ (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळा दबदबा असणारे बसवराज पाटील यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन कमळ हाती घेतल्यानंतर प्रथमच मुरूम शहरात आगमन झाले. त्यांच्या निवासस्थानी जाऊन हजारो कार्यकर्त्याच्या उपस्थितीत बसवराज पाटील यांचे शनिवारी (ता. २) रोजी भव्य पुष्पहार, शाल, फेटा घालून जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी औसा, निलंगा तालुक्यातील शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह मुरूम शहरात आगमन होताच शहर भाजपमय झाल्याचे दिसून येत होते. या सत्काराला बसवराज पाटील उत्तर देताना म्हणाले की, गेल्या ४० वर्षात पक्षाचा एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम केले. हे करत असताना मी सामान्य जनतेचा विकास, त्यांना अधिक न्याय कसा देता येईल, याकडे लक्ष दिले. राजकारणापेक्षा समाजकारण महत्त्वाचे मानून मी काम करत राहिलो. आता भाजपात प्रवेश केल्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या भूमिकेला डोळ्यासमोर ठेवून मी पक्षात प्रवेश केला आहे. नरेंद्र मोदी यांचे देशाभिमान व विकासाभिमुख नेतृत्व डोळ्यासमोर ठेवून पवार व मी एकत्रित हा विकासाचा रथ पुढे घेऊन जाणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी त्यावेळी केले. आ. अभिमन्यू पवार म्हणाले की, बसवराज पाटील यांच्या रूपाने एक मोठे व्यक्तिमत्व भाजपाला मिळाले आहे. तेव्हा धाराशिव-लातूर जिल्ह्यालाच नव्हे तर सबंध मराठवाडा व कर्नाटक राज्यातील भाजप पक्षाला मोठी ताकद आणि बळ मिळणार आहे. पक्ष वाढीसाठी व विकासासाठी आम्ही दोघेही प्रयत्न करू. बसवराज पाटील हे मला मोठ्या बंधूसारखे असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी अधिक वेगाने काम करण्यास तयार असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. यावेळी युवानेते अँड. परिक्षीत पवार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, युवानेते शरण पाटील, शिरीष उटगे, तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, विधानसभा प्रभारी संतोषअप्पा मुक्ता, मार्केट कमिटीचे चेअरमन शेखर सोनवणे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष किरणअप्पा उटगे, भाजप शहराध्यक्ष सुनिलअप्पा उटगे, युवराज बिराजदार, ज्ञानेश्वर वाकडे, सुधीर पोतदार, युवराज गोरे, सदाशिव जोगदंड, नितीन पाटील, ओम बिराजदार, बंडू कोदरे, काकासाहेब मोरे, भीमाशंकर राचट्टे, संगमेश्वर ठेसे, बसवराज धाराशिवे, हणमंत राचट्टे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार युवानेते शरण पाटील यांनी मानले. यावेळी हजारोच्या संख्येने विविध गावातून आलेले पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील पाटील यांच्या निवासस्थानी बसवराज पाटील यांचा भव्य पुष्पहार घालून सत्कार करताना आ. अभिमन्यू पवार, अँड. परिक्षीत पवार, सुभाष जाधव, संतोषअप्पा मुक्ता, किरण उटगे, सुनिल उटगे, बापूराव पाटील, शरण पाटील, ज्ञानेश्वर वाकडे, सुधीर पोतदार व अन्य.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!