ताज्या घडामोडी

शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे व शिक्षक सेनेचे नेते शिवाजी शेंडगे यांनी विधानसभेच्या पायरीवर केले लाक्षणिक उपोषण

Spread the love

भारत कवितके मुंबई कांदिवली . शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे व शिवसेना शिक्षक सेनेचे नेते शिवाजी शेंडगे तसेच वस्ती शाळा शिक्षकांचे नेते किरण अग्रवाल यांच्या नेतृत्वात शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी विधानसभेच्या पायऱ्यांवर लक्षवेधी उपोषण करण्यात आले राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एक नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू केल्याचा सुधारित जीआर त्वरित काढावा त्यात संभाजीनगर खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार वस्ती शाळा शिक्षकांचा देखील समावेश करावा 2005 नंतरच्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी सर्व शिक्षकांना कॅशलेस मेडिक्लेम देण्यात यावा 24 वर्षांची सेवा पूर्ण झालेल्या सर्व शिक्षकांना सरसकट निवड श्रेणी मिळावी रात्र शाळेच्या एकल शिक्षकांना पूर्ण पगार द्यावा 2016 च्या शिक्षकांना सामावून घ्यावे तसेच दुबार शिक्षकांचे थकलेले पगार त्वरित अदा करावेत व दहावी बोर्डाच्या परीक्षा सुरू असल्याने त्या काळातील शिक्षकांचे प्रशिक्षण त्वरित रद्द करावे शिक्षकांना टीआर टॅग देऊन सर्व सेवा सुविधांमध्ये प्रथम प्राधान्य द्यावे शिक्षकांच्या अशा विविध मागण्यांबाबत विधान भवनाच्या पायऱ्यावर शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे शिक्षक सेनेचे नेते शिवाजी शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले याची दखल घेऊन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आमदार प्रकाश सुर्वे शिक्षक सेनेचे शिवाजी शेंडगे किराणा अग्रवाल व इतर शिक्षकांना चर्चेसाठी त्यांच्या दानात बोलवले व वरील मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचे त्वरित मान्य केले सदर मागण्यांचे निवेदन देखील शिवसेना शिक्षणाचे शिवाजी शेंडगे सर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!