ताज्या घडामोडी

न्यू इंग्लिश स्कूल सैतवडेत राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

Spread the love

बुधवार दि. 28 फेब्रुवारी 2024 ला सैतवडेतल्या शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल सैतवडे प्रशालेत राष्ट्रीय विज्ञान दिनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशालेचे विज्ञान शिक्षक व मुख्याध्यापक श्री.अंगद मुठाळसर यांनी आपल्या प्रास्ताविकात राष्ट्रीय विज्ञान दिनाबद्दल विद्यार्थी वर्गाला उद्बोधक माहिती देताना डॉ. सी. व्ही. रमण यांच्या प्रकाशाच्या विकिरणाचे स्पष्टीकरण दिले. विद्यार्थी वर्गामधून रोशनी खापले,ऋतुजा बैकर,श्रावणी पवार,साक्षी शिगवण, मनस्वी किंजळे,मंजिरी चौघुले,श्रेयश्री धातकर,सिया पांचाळ,हर्ष साईलकर, सार्थक शिगवण यांनी विविध शास्त्रज्ञ व त्यांनी लावलेले शोध व आरोग्य विषयक मौल्यवान अशा माहितीचे वाचन केले. गणित विषय शिक्षिका संज्योत खेडेकर मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालक व प्रमुख वक्ते म्हणून भूमिका बजावत अनेक वैज्ञानिकांनी केलेली कामगिरी मांडताना विद्यार्थी अचंबित झाले. श्री. नितीन जाधव सरांनी प्रमुख वक्ते म्हणून विद्यार्थी वर्गाला विद्यार्थ्यांची संशोधक वृत्ती वाढीस लागावी यासाठी प्रेरित करताना विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.दैनदिन जीवन जगताना येणाऱ्या अडचणींवर मात करून समाजाला सुखी करण्यासाठी आपण आपलं विज्ञान मन आणि डोकं वापरून छोटे छोटे प्रयोग करत राहण्याचे आवाहन करून इन्स्पायर अवार्ड सारख्या उपक्रमांत सक्रिय सहभागी होण्यासाठी सूचित केले.तसेच इस्रो- नासा सारख्या अंतराळ संशोधन करणाऱ्या संस्थांच्या व्हिजिट कॅंपमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित केले.प्रशालेत यानिमित्त रांगोळी स्पर्धा,विज्ञान शाप की वरदान या विषयावर वाद विवाद स्पर्धा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापक श्री. अंगद मुठाळ सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात विचारमंचावर श्रीम. लांजेकर मॅडम, संतोष चव्हाण सर , शेकासन मॅडम,रमेश गंधेरे सर,नितीन जाधव सर व संज्योत खेडेकर मॅडम इ. मान्यवर शिक्षक वृंद उपस्थित होता. संपूर्ण कार्यक्रमाची फोटोग्राफी भूषण विकास देव्हारे याने तर फलक लेखन व आभार प्रदर्शन कलाध्यापक श्री.रमेश गंधेरे सरांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!