ताज्या घडामोडी

कोल्हापुर रोड, समर्थ कॉलनी येथे मोपेड मोटर सायकल वरुन जावून पहाटे घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केली असल्याची कबूली

Spread the love

दि. ०७.२.२०२४ रोजी फिर्यादी नामे विनोद श्रीचंद खत्री, रा. सांगली हे त्यांचे कुटूंबियांसोबत त्यांचे मुलीचे लग्नाकरीता कोल्हापुर येथे गेले असता, अज्ञात चोरटयाने फिर्यादीचा बंगला फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती. गुन्हयाचे गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक संदीप घुगे तसेच  अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांनी स्वतः घटनास्थळी भेट देवून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करून, नमुद गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन घरफोडीचे गुन्हे करणारे संशयीत इसमांची माहिती काढुन व तांत्रीक माहितीच्या आधारे नमुद गुन्हा उघड करणेबाबत मार्गदर्शन करून निर्देश दिले होते.त्या अनुशंगाने दि. १३/०२/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकामधील सपोफौ / अनिल ऐनापुरे यांना त्यांचे बातमीदाराकडुन, घरफोडी चोरी करून मिळालेले सोने विक्री करणेकरीता दोन इसम अंकली फाटा येथे निळे रंगाचे मोपेड मोटर सायकलवर येवून थांबलेले आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली.
नमुद पथक मिळाले बातमीप्रमाणे, अंकली फाटा परीसरात निगराणी करीत असताना दोन इसम निळे रंगाचे मोपेड मोटर सायकलवर संशयीतरित्या रोडकडेला थांबलेले दिसले. त्यांचा बातमीप्रमाणे संशय आलेने सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने सदर इसमांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी आपले नांव १) राजु प्रकाश नागरगोजे, वय ३६ वर्षे, मुळ रा. सांवतगल्ली, उचगाव, ता. कोल्हापुर, जि. कोल्हापुर. सध्या रा. बारशी रोड, बाळे, ता. उत्तर सोलापुर, जि. सोलापुर व २) नितेश आडवय्या चिकमठ, वय २९ वर्षे, रा. सावरकर कॉलनी, गल्ली नं. २, विश्रामबाग, सांगली असे असलेचे सांगितले. सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यांचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, राजु नागरगोजे याचे जवळ असले सॅक मध्ये सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळुन आली. त्यांना त्यांचे कब्जातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम बाबत विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यांना विश्वासात घेवून त्यांचेकडे चौकशी केली असता, नितेश चिकमठ याने सांगितले की, तो व त्याचा साथीदार राजु नागरगोजे असे दोघांनी मिळून कोल्हापुर रोड, समर्थ कॉलनी येथे मोपेड मोटर सायकल वरुन जावून पहाटे घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केली असल्याची कबूली दिली.सदर सोन्याचे दागिने व रोख रक्कमेबाबत सांगली शहर पोलीस ठाणेचे क्राईम अभिलेख तपासला असता, वरीलप्रमाणे घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली. लागलीच त्यांचे कब्जातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व गुन्हयात वापरलेली मोपेड मोटरसायकल पुढील तपास कामी सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचासमक्ष जप्त केले. राजु प्रकाश नागरगोजे हा रेकॉडवरील सराईत गुन्हेगार असून त्याचेवर सांगली, कोल्हापुर व कर्नाटक येथे घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी सांगली शहर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!