ताज्या घडामोडी

धनगरवाडा मंनदूर (ता) अनेक सोई सुविधापासून वंचीतच

Spread the love

शिराळा प्रतिनिधी:- सांगली जिल्ह्यातील डोंगरकड्या कपारी मध्ये राहणाऱ्या नागरिकांचे कडे आज स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली तरी सोयी -सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. धनगरवाडा मंनदूर (ता.शिराळा) येथे पहावयास मिळत आहे.

परवा धनगरवाडा येथील एक व्यक्ती मयत झाला होता . या गावाच्या जमिनीचा प्रश्न गेले अनेक वर्षे प्रलंबित असून शासन यामध्ये कचखाऊ धोरण घेत आहे. येथील महिला व पुरुषांनी शासन दरबारी अनेक वेळा मोर्चे आंदोलने केली परंतु त्यांना शासनाकडून आश्वासनाशिवाय काही मिळाले नाही.गावाला साधे स्मशान भूमी नसल्याने डोंगरकड्या कपारीतील लोकांना अंत्यविधी करताना कसरत करावी लागत आहे . येथे मंगळवारी पावसात उभा राहूनच रक्षा विसर्जन कार्यक्रम करावा लागला. अनेक गावांमध्ये सोयी सुविधा मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या .परंतु धनगर वाड्यासारखे गाव यामध्ये पूर्णपणे दुर्लक्षित राहिले आहे.यावेळी अनेक महिला व वयस्कर नागरिकांनी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणधीर नाईक यांच्याकडे आपल्या असणाऱ्या सोयीसुविधा नसले बाबत व प्रसासानावर्ती असलेली नाराजी व्यक्त केली.

यावेळी रणधीर नाईक म्हणाले,मंनदूरच्या धनगर वाड्यावरील लोकांना अनेक अडचणींना सामना करत आपला उदरनिर्वाह करावा लागत आहे.जवळपास साठ वर्षे पूर्वी येथील लोकांना जमिनी देण्याचा शासनाने निर्णय केला होता .परंतु फॉरेस्ट व महसूल विभागाच्या आडमुट्या धोरणामुळे व नाकरतेमुळे अद्यापी येथील शेतकऱ्यांच्या नावावरती जमिनी झालेल्या नाहीत . त्यामुळे येथील शेतकऱ्यांना सार्वजनिक सोयी सुविधा पासून वंचित राहावे लागले आहे.या ठिकानचे लोक स्मशानभूमी होण्यासाठी सातत्याने प्रशासनाकडे मागणी करत आहे.परंतु वनविभाग जागेसाठी संमती देत नसल्यामुळे स्मशानभूमी बांधता येत नाही. परवा मयत झालेल्या व्यक्तीचा अंत्यविधी पार पाडताना भर पावसात हा विधी पार पाडावा लागला. दुर्दैवाने मयत झालेल्या शेतकऱ्यांची विटंबना झालेल्यातला हा प्रकार पहावयास मिळाला आहे गेल्या अनेक वर्ष *”शेतकरी आम्ही जगायचे कसे मायबाप हा”* विषय येथील नागरिकांच्या पुढे उभा राहिला आहे. शासनाने सहकार्य मिळणार नसेल किंवा तातडीने या प्रश्नावर निर्णय झाला नाही तर येथील नागरिक या पुढील काळात टोकाचा आंदोलनाचा निर्णय घेतील. या सर्व परिस्थितीला प्रशासनच जबाबदार राहणार आहे . त्यामुळे प्रशासनाने ताबडतोबिनी त्यांच्या जमिनी नावावरती करून द्याव्यात व इतर सुख सुविधेच्या कामाच्या मंजूऱ्याना प्रशासकीय मान्यता द्यावेत असा निर्णय करावा अशी रणधीर नाईक यांनी मागणी केली.
यावेळी माजी सभापती हनमंतराव पाटील, मंनदूर गावचे माजी सरपंच वसंत पाटील, संचालक प्रकाश जाधव,आनंदराव चौगुले, शिवाजी पाटील, कोंडीबा पाटील, बाबुराव डोईफोडे, राजेंद्र डोईफोडे, विठ्ठल शेळके, भागोजी डोईफोडे, बबन डोईफोडे, धोंडीबा डोईफोडे, तुकाराम गावडे, सिताराम गावडे व महिला व पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!