ताज्या घडामोडी

पालघर जिल्ह्यातील शालेय क्रीडा स्पर्धा ऑगस्ट पासूनपासून होणार सुरू

Spread the love

जिल्ह्यातील ४० हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धांमध्ये व्हावे सहभागी:, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांचे आवाहन

पालघर जिल्हा प्रतिनिधी
पालघर तालुक्यातील शालेय क्रीडा स्पर्धा ऑगस्ट महिन्यापासून सुरू होणार असून या स्पर्धांच्या नियोजनासाठी बोईसर येथील डॉन बॉस्को विद्यालयाच्या सभागृहामध्ये पालघर तालुक्यातील क्रीडा शिक्षकांची सभा बुधवारी (तारीख १२) पार पडली.

या सभेला पालघर जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांनी, गेल्या वर्षी पालघर जिल्ह्यातील २३६५८ विद्यार्थी शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते. यावर्षी जिल्ह्यातील ४० हजार च्या वर विद्यार्थ्यांनी शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले. जिल्ह्यातील अधिकाधिक शाळांनी स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी हजार रुपये असलेली प्रवेशिका फी अर्थातच संलग्नता फी यावर्षी फक्त पाचशे रुपये करण्यात आली असून तालुका आणि जिल्हा स्तरावरील सर्व विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र आणि मेडल देण्यात येतील. तर तालुका क्रीडा अधिकारी भक्ती आम्रे यांनी सांगितले की, तालुकास्तरीय स्पर्धांच्या आधी ऑनलाइन प्रवेशिका भरणे बंधनकारक असून अधिकाधिक विद्यार्थ्यांना शालेय स्पर्धेमध्ये सहभागी करून घ्यावे. काही अडचण असल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा.

यावेळी पालघर जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष डेरेल डिमेलो, पालघर तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पाटील, उपाध्यक्ष विलास पाटील, जिल्हा शारीरिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष अजय राऊत आदींनी मनोगत व्यक्त केले.

या सभेमध्ये पालघर तालुका केंद्रप्रमुख म्हणून प्रकाश पळसुळे, उपकेंद्र प्रमुख म्हणून राजेंद्र सांबरे पाटील, हेमलता पाटील, कमलाकर पाटील आणि पराग पाटील यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी पालघर जिल्ह्यातील राष्ट्रीय पंच परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मयूर पवार, आशिष पाटील आणि किरण थोरात यांचा तसेच पालघर तालुका केंद्रप्रमुख पदाची अकरा वर्षे यशस्वी धुरा सांभाळलेल्या राम पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पालघर तालुका केंद्रप्रमुख राम पाटील यांनी या सभेचे प्रास्ताविक केले. यावेळी डॉन बॉस्को विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सिस्टर अनुजा, माजी मुख्याध्यापक सुधाकर ठाकूर, सह केंद्रप्रमुख कमलाकर पाटील, पराग पाटील, आशिष पाटील आदी पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने क्रीडा शिक्षक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!