ताज्या घडामोडी

दुर्मिळ नाणी, नोटा व स्टॅम्पसचे प्रदर्शन

Spread the love

इस्लामपूर दि.१४ प्रतिनिधी
पूर्वीच्या काळी नोटा,नाणी कशी होती? त्याकाळी आर्थिक व्यवहार कसे होत होते? हे जाणून घेणे आपल्या ज्ञानात भर घालणारे आहे. त्यादृष्टीने प्रत्येकाने हे दुर्मिळ नाणी, नोटा व स्टॅम्पसचे प्रदर्शन पहावे आणि आपल्या मुलांना,घरातील महिलांनाही दाखवावे,असे आवाहन माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी केले.
इस्लामपूर येथील राजारामबापू ज्ञान प्रबोधिनी च्या सभागृहात प्रबोधिनी आणि महाराष्ट्र अंध श्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने दुर्मिळ नाणी,नोटा व स्टॅम्पस चे प्रदर्शन आयोजित केलेले आहे. या प्रदर्शनाचे आ. पाटील यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. याप्रसंगीत ते बोलत होते. प्रबोधिनी चे अध्यक्ष प्रा.शामराव पाटील,अंनिस चे राज्य कार्यवाह संजय बनसोडे,प्रा.डॉ.एस.बी.माने,कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव आर.डी.सावंत,प्राचार्या दीपा देशपांडे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
आ.पाटील म्हणाले, मला लहानपणा पासून पूर्वी काय होते?,पूर्वी काय झाले? हे जाणून घेण्याची आवड आवड आहे. मी इयत्ता ४ थी मध्ये असताना श्रीमान योगी,छावा आदी असंख्य ऐतिहासिक कादंबऱ्या वाचल्या आहेत. मला नेहमी उत्सुकता होती की,छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात नाणी,नोटा कशा असतील,त्यांचे व्यवहार कसे होत असतील? त्यावेळी आदिलशाही,कुतुबशाही,तसेच राजे-रजवाड्यांचे एकमेकांशी व्यवहार कसे होत असतील?. स्वतःचे नाणे सुरू करणे म्हणजे आपण प्रस्थापित झाल्याचे ते प्रतीक मानले जात असावे. मी वयाच्या २३ व्या वर्षी युरोप देशांचा दौरा केला होता. त्यावेळी ३० दिवस रेल्वेने फिरलो. अगदी २१ हजार खर्च आला. येताना मी अनेक नाणी आणली होती.
अंनिसचे राज्य कार्यवाह संजय बनसोडे म्हणाले,आपल्या तालुक्यात इतके दुर्मिळ व नाविन्यपूर्ण नाणी,नोटा व स्टॅम्पसचे प्रदर्शन प्रथमच भरले आहे.१७५ देशातील नाणी ठेवण्यात आली आहेत. हे प्रदर्शन प्रत्येक व्यक्तीसह विद्यार्थी व युवक-युवतींनी पाहायला हवे. यावेळी नाणी,नोटा व स्टॅम्पस संग्राहक प्राचार्य एस.व्ही.माने,वसंतराव तुकाराम पाटील,सचिन माने,अजित सबनीस, छाया ओतारी यांचा सत्कार करण्यात आला.
प्रारंभी प्रा.डॉ.एस.बी.माने यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषणात नाणी,नोटा,तसेच प्रदर्शनाबद्दल माहिती दिली. यप्रसंगी अँड. चिमनभाऊ डांगे,पै.भगवान पाटील,दादासो पाटील,अँड.धैर्यशील पाटील,शंकरराव पाटील,डॉ.एन.टी.घट्टे,शिवाजीराव कुंभार, प्रा.डॉ.नितीन शिंदे,प्रा.सतिश चौगुले,प्रा.प्रदीप पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सूरज उर्मिला यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!