ताज्या घडामोडी

सवयीप्रमाणे श्रेय लाटणे व आयत्या ताटावर जेवायला बसायची सवय बंद करा. – आ. मानसिंगराव नाईक

Spread the love

शिराळा (प्रतिनिधी) 

शिराळा मतदार संघातील शिराळा, तांबवे व ऐतवडे बुद्रूक या गावांना पूर, अतिवृष्टी मुळे होणाऱ्या नुकसानीबाबत अथवा येथील संभाव्य नुकसान टाळण्यासाठी पूर संरक्षक भिंती व पूरक कामांसाठी माझ्या मागणीनुसार 10 कोटी 82 लाख 10 हजार 652 रुपयांच्या कामांना मंजूरी मिळाली आहे. मात्र काही मंडळी आपल्या सवयीप्रमाणे याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केविलवाणी प्रयत्न करत आहेत. अशी माहिती व खरमरीत टिका सांगली जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी सत्यजीत देशमुख यांचा नामोल्लेख टाळून केली.
ते म्हणाले, शिराळा मतदार संघातील वरील तीन गावांना महापूर, पूर, ढगफुटीसदृष पावसाचा मोठा फटका बसतो. त्यामुळे येथील पूर्वीच्या उपाय योजना तोकड्या पडत होत्या. त्यात वेळोवेळी आलेल्या महापूरामुळे येथील मोठे नुकसान झाले आहे. येथील संभाव्य धोका ओळखून शेती, नागरी वस्ती, दुकाने आदींसाठी आवश्यक त्या उपाय योजना करणे गरजेचे आहे. त्यासाठी मी तत्कालिन जलसपंदा व लाभक्षेत्र विकास मंत्री मा. जयंतराव पाटीलसाहेब व महाआघाडी सरकारकडे वस्तूस्थितीची पहाणी करून योग्य तो निर्णय घेण्याची विनंती केली होती. त्यावरून सदर ठिकाणी कोणकोणती कामे करावी लागत त्याचे प्रस्ताव करण्यात आले. त्यानुसार यास मंजूरी मिळाली आहे. विशेष करून मंत्रीमहोदय मा. गिरीष महाजन यांचे विशेष आभार मानतो.
आमदार नाईक म्हणाले, शिराळा हे तालुक्याचे गाव. गावालगत किंबहूना मध्यावरून तोरण ओढा वाहतो. ओढ्याच्या दोन्ही बाजूस नागरी वस्ती आहे. सन 2019 व 2005-06, सन 2019 व 2021 मध्ये ओढ्यास आलेल्या महापूरामुळे ओढ्यालगत असणाऱ्या भिंतीचे, रस्त्यांची व घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. त्यामुळे ओढ्याच्या दोन्ही तिरावरील ग्रामस्थाांची घरे, दूकाने, रस्ते, मंदीरे यांना वारांवार धोका निर्माण होत आहे. सन 2019 व जुलै 2021 मध्ये आलेल्या महापुरामुळे तसेच प्रत्येक वर्षी येणाऱ्या पाऊसाच्या पाण्याने ओढ्याच्या दोन्ही स्तरावरील दगडी बाांधकामातील भिंती जीर्ण होऊन पडल्या. लगतच्या घरांचे व रस्त्याचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे ओढ्याच्या दोन्ही स्तरावरील भविष्यात होणारे नुसान टाळण्यासाठी मी जून्या भिंतीस आधार भिंतीचे बांधकाम करावे व आवश्यक तेथे नवीन भिंत व घाट बांधकाम करण्याची मागणी केली होती. त्यानुसार नवीन भिंत व घाट बाांधकाम करण्यासाठी पाहाणी व सर्वेक्षण करून अंदाजपत्रक तयार करण्यात आले. या कामाच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्याता शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार प्रस्तावास 4 कोटी 46 लाख 71 हजार 358 रुपये एवढया खर्चाच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहेत.
ते म्हणाले, वारणा नदीवरील ऐतवडे बुद्रूक (ता. वाळवा) हे गाव वाकुर्डे योजनेच्या भाग 2 अंतर्गत लाभक्षेत्रात येते. या गावातील कवठे पाणंद रस्त्यालगत सलेल्या शेतीचा काही भाग सन 2021 मधील अतिवृष्टीत व जुलै 2021 मधील झालेल्या ढगफुटीसदृष्य अतिवृष्टीमुळे स्थानिक ओढ्यात ढासळ्यामुळे ऐतवडे खुर्द येथील शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. सन 2021 मधील महापूरामुळे सदर ठिकाणी मोठे नुकसान झाल्याने मी पहाणी करून येथे नवीन पूरसंरक्षक भिंत बांधून देण्याबाबत मागणी केली होती. त्याचे अंदापत्रक बनवून सादर करण्यात आले होते. ही बाब शासनाच्या विचाराधिन होती. त्यावर कृष्णा खोरे विकास महामंडळाने ऐतवडे बुद्रूक येथील कवठे पाणंद येथील रस्त्यालगत पूर संरक्षक भिंत बांधकामासाठी 2 कोटी 6 लाख 5 हजार 565 रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे.
आमदार नाईक म्हणाले, तांबवे (ता. वाळवा) हे गावाचा मुख्य भाग नदीकाठी कोठभाग व हाळभाग अशा दोन भागात वसले आहे. येथे सन 2019 व 2021 मध्ये आलेल्या महापूरात कोटभागामधील 200 ते 250 घरांना धोका निर्माण झाला होता. त्यावेळी जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री मा. जयंतराव पाटील यांनी माझ्या मागणीवरून पूरसंरक्षक भिंत व घाट तसेच आवश्यक तेथे अस्तित्वात असलेल्या भिंतीजवळ, नवीन पूरसंरक्षक आधार भिंत बांधण्याचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शासनास प्रस्ताव सादर करण्यात आले होते व ही बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यावर झालेल्या निर्णयानुसार सदर कामासाठी 4 कोटी 29 लाख 33 हजार 729 रुपये खर्चाच्या आराखड्यास मंजूरी मिळाली आहे.
ते म्हणाले, जनतेची गरजेची विकास कामे करणे, त्यांना अडचणीच्या काळात मदतीचा हात देणे, त्यांच्या सुख व दुःखाच्या काळात आधार देणे, नव नवीन प्रकल्पांची उभारणी करून लोकांच्या हातस काम देणे, शैक्षणिक, सामाजिक, आर्थीक, सांस्कृतिक प्रगती साधने हे लोकप्रतिनिधी या नात्याने मी सतत करत आलो आहे. समाजातील प्रत्येक घटकाला प्रगतीच्या प्रवाहात पुढे आणले जात आहे. दुसऱ्या बाजून आमचे विरोधक कांही न करता मात्र सर्ववेळ राजकारण करत सुटले आहेत. त्यांनी आगोदर जमिनीची मशागत करावी. दर्जेदार बियाणची पेरणी करावी. स्वतःच्या हिमतीवर जोमदार पिक आणावे. मग जणतेचा ओरडून सांगावे, हे माझे कर्तुत्व म्हणून. आम्ही मशागत करून, पिकवून आणलेल्या जोमदार पिकावर हक्क अथवा हे मीच पिकवले म्हणून सांगण्याचा प्रयत्न करू नये. जनता खुप शहाणी असून म्हणून तर त्यांनी अजून तुम्हाला ठेवायचे तेथेच ठेवले आहे, हे विसरू नका. दुसऱ्याच्या कामाचे श्रेय लाटू नका, आम्ही तयार केलेल्या जेवणाच्या ताटावर आयते येवून जेवायला बसू नका, एवढाच सल्ला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!