देश विदेश

सांगली जिल्हा धनगर समाज महासंघासह समाजाच्या विविध सांगली जिल्हाध्यक्षांच्या निवडी जाहीर

Spread the love

सांगली जिल्हा धनगर समाज महासंघ जिल्हाध्यक्षपदी श्री. संजय पाटील (दादा), तासगांव, अहिल्या महिला संघ जिल्हाध्यक्षपदी सौ. सविताताई मदने, सांगली, मल्हार सेना जिल्हा प्रमुखपदी श्री. शंकर वगरे, जत, कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्षपदी प्रा. जगन्नाथराव कोळपे, आटपाडी, सांस्कृतीक विभाग जिल्हाध्यक्षपदी श्री. सर्जेराव टकले, भिलवडी यांची निवड जाहीर

आष्टा, ता. वाळवा येथील मा. आण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुलात सांगली जिल्हा धनगर समाज महासंघाची जिल्हापदाधिकारी निवडीसंदर्भात महाराष्ट्राचे माजी ज्येष्ठ मंत्री, धनगर समाजाचे राज्याचे नेते मा. श्री. आण्णासाहेब डांगे (आप्पा) यांच्या प्रमुख उपस्थितीत व महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा. अँड. राजेंद्र उर्फ चिमणभाऊ डांगे यांच्या अध्यक्षतेखाली व्यापक बैठक संपन्न झाली.

यावेळी सांगली जिल्हा धनगर समाज महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी तासगांवचे जिल्हा परिषद सदस्य श्री. संजय दत्तु पाटील (दादा) व अहिल्या महिला संघ जिल्हाध्यक्षपदी सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या नगरसेविका सौ. सविताताई दादासो मदने तर मल्हार सेना सांगली जिल्हा प्रमुखपदी श्री. शंकरराव रामू वगरे, जत यांची तर कर्मचारी आघाडी सांगली जिल्हाध्यक्षपदी प्रा. जगन्नाथराव बाबा कोळपे, आटपाडी यांची व सांस्कृतीक विभाग सांगली जिल्हाध्यक्षपदी श्री. सर्जेराव बापू टकले, भिलवडी यांची निवड सांगली जिल्हाच्या व्यापक बैठकीत जिल्हा परिषद सदस्य श्री. संभाजीराव कचरे (आबा) यांनी सर्वानुमते जाहीर केली.

उपस्थित सर्व नुतन जिल्हाध्यक्षांचा सत्कार महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मा. अँड. राजेंद्र उर्फ चिमणभाऊ डांगे यांच्या शुभहस्ते करणेत आला. यावेळी बोलताना मा. श्री. आण्णासाहेब डांगे म्हणाले की, महासंघाच्यावतीने राज्यभर आगामी काळामध्ये जिल्हावाईज मेळावे घ्यावेत व सर्व जिल्ह्यांच्या नविन कार्यकाकरणी तयार कराव्यात, राज्यातील धनगर समाज बांधवांचे चिंतन शिबीर घ्यावे व समाजाच्या निरनिरळ्या प्रश्नांसह आरक्षण प्रश्नांवर धोरणात्मक भूमिका घेण्याच्या दृष्टीने आक्रमकपणे वाटचाल करावी.

यावेळी महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मा. अँड. राजेंद्र उर्फ चिमणभाऊ डांगे म्हणाले की, महाराष्ट्र धनगर समाज महासंघ ही कोणत्याही राजकीय पक्षाची संघटना नसुन या धनगर समाज महासंघामध्ये सर्व राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी सक्रीयपणे सहभागी होत असतात व समाज हिताची आपली भूमिका आक्रमकपणे मांडत असतात. समाजातील काही नेत्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी धनगर समाजाचा वापर करून समाजाला वा-यावर सोडले आहे हे बरोबर नाही. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष प्रा. आर. एस. चोपडे, श्री. संभाजीराव कचरे, सांगलीचे नगरसेवक श्री. गजानन अलदर तसेच महासंघाचे नुतन जिल्हाध्यक्ष श्री. संजय पाटील (दादा), मल्हारसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. शंकरराव वगरे, अहिल्या महिला संघाच्या जिल्हाप्रमुख सौ. सविताताई मदने, सांस्कृतीक विभागाचे सांगली जिल्हाध्यक्ष श्री. सर्जेराव टकले यांनी मनोगते व्यक्त केली.

यावेळी महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. अरूण घोडके, माजी जिल्हा परिषद सदस्य कुंडलीक ऐडके, उद्योजक बाबूराव हुबाले, इस्लामपूरच्या नगरसेविका शुभांगीताई शेळके, माजी सभापती शोभाताई होनमाने, शिवाजीराव यमगर, किसन गावडे, वाळवा तालुकाध्यक्ष अविनाश खरात, बाळासाहेब फोंडे, प्रकाश ढंग, डॉ. अशोकराव ऐडगे, प्रकाश ऐडगे, विलास काळेबाग, डॉ. प्रमोद धायगुडे, किसन जानकर यांच्यासह सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील समाजाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व दिपप्रज्वलनाने व्यापक बैठकीची सुरुवात करणेत आली. स्वागत व प्रास्ताविक श्री. सुनिल मलगुंडे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री. बजरंग कदम यांनी केले तर कार्यक्रमाचे संयोजन श्री. सुनिल शिणगारे यांनी केले. शेवटी आभार श्री. प्रकाश कनप यांनी मानले. वरील सर्व सांगली जिल्हाप्रमुख यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!