ताज्या घडामोडी

तांदुळवाडी ( ता . वाळवा ) ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदि सौ .मनिषा राजाराम मोटे यांची निवड .

Spread the love

आनंदा कांबळे   -तांदुळवाडी

तांदुळवाडी ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच गेल्या ४ वर्षात ४ महिला उपसरपंच निवडणून महिलांना ५० टक्के मिळाले पाहिजे हे वाक्य सरपंच रमेश वसंतराव पाटील यांनी खरे करून दाखवल्याचे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. सौ .सुनिता अर्जुन नांगरे पाटील , सौ .अश्विनी प्रदीप जाधव , सौ . शोभा रमेश कांबळे व नूतन उपसरपंच सौ. मनिषा राजाराम मोटे या ४ महिलांना ग्रामपंचायतीत उपसरपंच म्हणून बहूमान देणारी तांदुळवाडी ग्रामपंचायत पहिलीच असावी .

स्वर्गीय वसंतराव विष्णू पाटील (काका ) यांनी गावाचा आदश॔ करभार पाहिला त्यांच्या कार्यकाळात ग्रामपंचायतीचा संपूर्ण कार्यभार त्यांच्या खांद्यावर असायचा व ते समथ॔पणे पेलवायचे .गावची पोलीस पाटीलकी सांभाळतांना त्यांनी कोणत्याही जाती धर्मातील लोकांना साधे दुखावलेही नाही लोक कशी जोडत जायची हे कौशल्य त्यांच्याकडे ठासून भरलेले होते . ग्रामपंचायतीत सव॔ जातीतील लोकांना समान संधी मिळावी असे त्यांचे वाक्य असायचे तेच वाक्य त्यांचा मुलगा सरपंच रमेश वसंतराव पाटील खरे करून दाखवतांना दिसत आहे .

गेल्या ४ वर्षाच्या काय॔काळात सरपंच यांनी अनेक चांगली कामे केलीत पण स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजूनही तसाच राहीला आहे . गावाला स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा हि प्रमुख मागणी ग्रामस्थांनी असुन ती त्यांनी पुण॔ करावी असे लोकांच्याकडून बोलले जात आहे तसेच सार्वजनिक शौचालयांची पुण॔पणे दुरावस्ता झाली असुन केवळ वरवर रंगरंगोटी करणेचै काम केले आहे .लोकांच्या आरोग्यावर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी सार्वजनिक शौचालये सतत स्वच्छ ठेवणेही तितकेच महत्वाचे आहे . किमान १५ दिवसातून शौचालय साफ करणारा कामगार बोलावून ती साफ करणेसाठी ग्रामपंचायतीनै प्रयत्नशील रहावे एवढीच ग्रामस्थांची माफक अपेक्षा आहे .एका वर्षात ग्रामपंचायत निवडणूका लागतील या अगोदरच ग्रामपंचायतीने कोणकोणत्या वार्डात काही समस्या आहेतका त्या पाहून त्या सोडवणेसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे तरच आगामी निवडणुकीसाठी ताठ मानेने लोकांच्याकडे मत मागायला जाऊ शकतो हे ग्रामपंचायतीच्या सव॔ सदस्य यांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. गेल्या ४ वर्षात इतर कामाच्या बाबतीत ग्रामपंचायत आघाडीवर असली तरी महत्वाच्या कामाकडे त्यांचे दुर्लक्ष होतांना दिसत आहे हे निश्चित .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!