ताज्या घडामोडी

शिवछत्रपती पुरस्कार विजेते पै. संजय माने यांचेवर कोकरूडमध्ये अंत्यसंस्कार

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

कोकरूड तालुका शिराळा येथील ट्रिपल महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान संजय माने यांचेवर रविवारी कोकरूड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पैलवान संजय माने त्यांच्या कुस्ती कारकिर्दीत बिजली मल्ल म्हणून गटातील त्याकाळात अव्वल खेळाडू म्हणून प्रसिद्ध होते. काल शनिवारी मुंबई येथे ते आपल्या कामावरून घरी परतत असताना त्यांना रेल्वे मध्येच हृदयविकाराचा धक्का बसला. हा धक्का एवढा तीव्र होता त्यांना त्यातून सावरता आले नाही, त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे सांगली सातारा कोल्हापूर व पुणे जिल्ह्यातील कुस्ती क्षेत्रातील मल्लांना व कुस्ती शौकीनाना मोठा धक्का बसला आहे. प्रारंभी माने यांनी महाराष्ट्र पोलीस मध्ये काही काळ सेवा बजावल्यानंतर त्यांनी रेल्वेमध्ये सेवा स्वीकारली होती. त्यांचा सर्वच राजकीय सामाजिक क्षेत्रातील लोकांशी अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध होता.अनेक क्षेत्रातील मित्रपरिवार त्यांनी जपले होते.आज शिराळा तालुक्यातील कोकरूड येथे त्यांच्या जन्म गावी त्यांच्यावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. आज त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी सांगली जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित भाऊ देशमुख, अर्जुन पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच काका पवार पुणे,महाराष्ट्र केसरी शिवाजी पाचपुते, महाराष्ट्र केसरी बापुसो लोखंडे, आंतरराष्ट्रीय खेळाडू युवराज वाघ, वस्ताद गणेश दांगट, दगडू करंजावणे, कॅप्टन शिवाजी मस्के, आंतरराष्ट्रीय कुस्ती संघ पुणे चे संदीप भोंडवे, शिव छत्रपती पुरस्कार विजेते नितीन दांगट, प्रकाश जाधव ,रंगराव हरणे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते नामदेव बोडरे, आनंदा गायकवाड,आनंदा शिंदे, पांडुरंग पाटील, आंतरराष्ट्रीय खेळाडू शिवाजी कोळी, सुनील निम्हण, उमेश पवार, बाबा शिरगावकर, दीपक कांबळे ,उपमहाराष्ट्र केसरी संपतराव जाधव ,शिवाजी लाड ,पांडुरंग पाटील, बाजीराव सनगर,मोहन पाटील, एक्साईज निरीक्षक पी आर पाटील, वसंत मोहिते अंकुश नागरे,श्रीरंग नांगरे आदी सह क्रीडा राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर व संपूर्ण परिवार, नातेवाईक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!