ताज्या घडामोडी

किल्ले वासोटावरील राजवाडा व परिसराची स्वच्छता.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

दि 19 ते 25 नोव्हेंबर दरम्यान साजरा केला जाणाऱ्या जागतिक वारसा सप्ताहाचे व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून दि 24 नोव्हेंबर रोजी वनपरिक्षेत्र वन्यजीव बामणोली , श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा, सांस्कृतिक कार्य विभाग पुरातत्व व वस्तू संग्रहालये संचालनालय महाराष्ट्र राज्य, दुर्गनाद ट्रेक ग्रुप यांचे विद्यमाने किल्ले वासोटा वरील राजवाडा व सदर परिसराची स्वछता करण्यात आली. किल्ले वासोटा महाराष्ट्रातील अत्यंत मोजक्या वनदुर्गंपैकी एक असून हा किल्ला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात वसला आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र युनेस्को द्वारा घोषित जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असून जगातील आठ biodiversity hottest hotspot पैकी एक आहे.
वासोटा किल्ल्यावरील सदर परिसर कारवी व काटेरी झुडुपांमध्ये पूर्ण झाकून गेला होता. सदर स्वछतेवेळी झाडे/ वृक्ष यांना कोणत्याही प्रकारे धक्का पोचवला गेला नाही.

इथून पुढे देखील पुरातत्व विभागाचे मार्गदर्शनाने बामणोली परिक्षेत्रातील वासोटा व महिमंडणगड येथिल ऐतिहासिक अवशेषांची त्यांचे मूळ स्वरूपास धक्का न लावता स्वछता करण्यात येणार आहे. जेणेकरून येणाऱ्या पर्यटकांना हा समृद्ध ऐतिहासिक वारसा अनुभवता येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!