ताज्या घडामोडी

धाराशिवला ३० जूनपासून तीन दिवसाची राज्यातील खो-खो प्रशिक्षकांची कार्यशाळा

Spread the love

निमित्त आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खो खो दिन

धाराशिव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या वतीने धाराशिव येथे राज्यातील खो-खो प्रशिक्षकांची प्रशिक्षण कार्यशाळा ३० जूनपासून सुरू होईल.

भारतीय खो खो महासंघाने ३० जून हा आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खो खो दिन तसेच २३ जून ते ३० जून हा आठवडा आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खो खो आठवडा म्हणून साजरा करावा, असे आवाहन केले आहे. त्यानुसार महाराष्ट्र खो खो असोसिएशनने ही कार्यशाळा २ जुलैपर्यंत आयोजित केली आहे.

याचे उद्घाटन ३० जून रोजी सकाळी १० वाजता महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव, महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सरचिटणीस ॲड. गोविंद शर्मा, चेअरमन सचिन गोडबोले, खजिनदार अरुण देशमुख आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेचा समारोप २ जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजता महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष आमदार अभिमन्यू पवार व महेश गादेकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.
——-
हे आहेत कार्यशाळेचे विषय

या कार्यशाळेत खेळाडूंचे तत्वज्ञान, मानसशास्त्र व शारीरिक तंदुरुस्ती, प्रशिक्षणाच्या विविध शैली व कौशल्ये, खेळाडूंचा आहार, ध्यान, प्रशिक्षण नियोजन व सुधारणा या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
————
हे तज्ञ प्रशिक्षक करणार मार्गदर्शन :
श्रीरंग इनामदार, डॉ. चंद्रजित जाधव, सारिका काळे, प्राची वाईकर, महेश पलांडे राजेंद्र साप्ते, नरेंद्र कुंदर, अमित राव्हटे, मुकुल खुटाळे, अपूर्वा कुंभकोणी, डॉ. काश्मीरा सबनीस, राहुल यादव, बिपिन पाटील, एजाज शेख, शिरीन गोडबोले, जयश्री खिलारे, रोहित रोंगे.
—–

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!