ताज्या घडामोडी

श्री. शांतलिंगेश्वर विरक्तमठ दुधनी येथे विविध कार्यक्रमांनी पुराण समाप्ती.

Spread the love

दुधनी:- सालाबाद प्रमाणे यावर्षी ही श्री शांतलिंगेश्वर विरक्तमठ दुधनी येथे परमपुज्य कवी डाॅ. पुट्टराज गवई या महास्वामीजींचे श्रावण महिन्यात त्यांचे चारिञ्याचे पुराणकथा सांगितले. कथा वाचक श्री. वेदमुर्ती शिवशरणय्या शास्ञी रा.चिणमगेरी यांनी भक्तगणांना मंञमुगध करीत कथा वाचन केले तर संगीत शास्ञी व गायक भागण्णा अवरळ्ळी तबला वादक सिध्दण्णा मालीपाटील यांनी केले. तसेच श्री. म.नि.प्र.लिं.गुरुशांतलिंगेश्वर महास्वामीजींचे 124वा जयंती चे अवचित्य साधुन जंगम समाजाचे वतीने सामुहिक लिंग धारण विधी केले यात 150 हुन अधिक लोकांनी लिंगधारण करुन घेतले याच दिवशी श्री. हानगल गुरुकुमारेश्वर दुधनी संघातर्फे प्रसाद वाटप केले तसेच मे.श्री. हानगल गुरु कुमारेश्वर फायनान्स च्या वतीने 10वी 12वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांना रोख बक्षीस देण्यात आला.
आज पुराण समाप्तीच्या दिवशी दुधनीचे मठाधीश श्री. म.नि.प्र.डाॅ. शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांनी मातृ-पितृ देवो भव याचे महत्व सांगण्यासाठी 25ते 30 विवाहित जोडप्यांना बोलावून त्यांच्या मुलांच्या हस्ते माता पितांना पादपुजा करणेस सांगितले यावेळी म्हणाले की आई वडील हेच तुमचे खरे देवी देवता आहेत यांनाच तुम्ही नमस्कार करा व त्यांची चांगली देखभाल करा ,सेवा करा तर तुम्हाला कुठलाही कष्ट येणार नाही असे महास्वामीजी सांगितले कार्यक्रमानंतर शिवकुमार नेल्लुर यांनी प्रसाद वाटप केले.
या सर्व कार्यक्रमात श्री. म.नि.प्र.शिवबसव राजेंद्र महास्वामी विरक्तमठ खेडगी व श्री. ष.ब्र.शांतविर शिवाचार्य महास्वामी हिरेमठ मादन हिप्परगा यांचे शुभहस्ते करण्यात आला. यात शांतलिंगेश्वर विरक्तमठ दुधनी पंचकमिटी, बैलगाडी संघ व दुधनीतील सर्व भक्तगण, व्यापारी वर्ग आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!