ताज्या घडामोडी

आपली कर्तव्ये निष्ठेने बजावणारी मुले कर्तबगार बनतात – मठाध्यक्ष नीलकंठ शिवाचार्य महाराज धारेश्वर

Spread the love

शिराळा (प्रतिनिधी)

आई, वडील व गरु पुजनिय असतात. त्यांच्याबद्दल आदर ठेवणारी, आपली कर्तव्ये निष्ठेने बजावणारी मुलेच मोठी व कर्तबगार बनतात, असे प्रतिपदन मठाध्यक्ष डॉ. निळकंठ शिवाचार्य महाराज धारेश्वर यांनी केले.
चिखली (ता. शिराळा) येथे विश्वासराव नाईक कारखान्याचे माजी अध्यक्ष, लोकनेते स्व. फत्तेसिंगराव नाईक (अप्पा) व स्व. लिलावती फत्तेसिंगराव नाईक यांच्या पुण्यतिथितीनिमित्त आयोजित प्रवचनात ते बोलत होते. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक व विश्वास कारखान्याचे उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील प्रमुख उपस्थित होते.
डॉ. धारेश्वर महाराज म्हणाले, समाजातील वास्तव पाहता सर्वच पातळीवर सध्या हाणी होत असल्याचे दिसून येत आहे. युवा पिढीला सावरण्याची गरज आहे. एकमेंकाद्दलचा आदर लोप पावत चाचला आहे. आई, वडील व गुरूंबद्दल आदर जपलाच पाहिजे. संस्कृती व सदाचार जपायला हवा. थोरा मोठ्यांचे मार्गदर्शन जसे हवे, तसा त्यांनी केलेल्या कामाचा वसा व वारसापण जोपासायला हवा. लोकनेते फत्तेसिंगअप्पांनी शिराळा व शाहुवाडी तालुक्यात जे काम उभं केले त्यामुळे त्यांचे आजवर व पुढेही नाव निघत राहील. सर्वसामान्य माणसाला स्वतःच्या पायावर उभं राहण्याचे बळ देत त्यांनी शेतीला पाणी व शास्वत दर दिला. त्यामुळे हजारा कुटुंबाना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले. आप्पांनी कामाचा वसा-वारसा कुटुंबालाही दिला. त्यामुळे त्यांच्या पश्चात त्यांचे कुटुंबियांनी सार्वजनिक विकासाचा, औद्योगिक प्रगतिचा वारसा जपून जनतेच्या कल्यानाकरीता आहोरात्र कष्ट घेत आहेत. यावेळी डॉ. धारेश्वर महाराजांनी अनेक उदाहरणे देत विवेचन केले.
यावेळी विश्वास शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमरसिंह नाईक, तालुक्याचे माजी सभापती ॲड. भगतसिंग नाईक, ‘प्रचीती’चे अध्यक्ष राजेंद्रसिंह नाईक, ॲड. करणसिंग चव्हाण, सुतगिरणीचे अध्यक्ष सुरेश चव्हाण, सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक, माजी सभापती व विद्यमान सदस्य सम्राटसिंग नाईक यांच्यासह नाईक कुटुंबातील सर्व सदस्य, तालुक्याच्या सभापती मानिषताई गुरव, उपसभापती बी. के. नायकवडी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, कार्यकारी संचालक राम पाटील, माजी कार्यकारी संचालक बाबासाहेब पवार, शिराळा नगराध्यक्ष प्रतिभाताई पवार, वाळवा तालुका महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्ष सुनीतताई देशमाने, विराजचे उपाध्यक्ष अशोकराव पाटील, ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट, आर. बी. शिंदे, डी. एन. मिरजकर, अनंत सपकाळ, एम. एम. पाटील, मतदार संघातील विविध संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर, हितचिंतक, विश्वास व विराज उद्योग समुहातील सर्व संचालक, पदाधिकारी, खातेप्रमुख, कर्मचारी, विविध गावचे सरपंच, उपसरपंच आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!