ताज्या घडामोडी

कबड्डी दिनानिमित्तच्या शालेय उपक्रमात इशांत पालव प्रथम   

Spread the love

आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे श्री हशू अडवाणी मेमोरियल स्कूल-गोवंडी सहकार्याने कबड्डी दिनानिमित्त झालेल्या १४ वर्षाखालील शालेय मुलांच्या विनाशुल्क कबड्डी नियमावरील प्रश्नोत्तर स्पर्धेत इशांत पालवने प्रथम क्रमांक पटकाविला. १०७ शाळकऱ्यांनी सहभाग घेतलेल्या मार्गदर्शनासह उपक्रमामधील विजेत्या-उपविजेत्यांना आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते, क्रीडा संघटक निवृत्ती देसाई, अण्णा शिर्सेकर, सुनील बोरकर, शिवाजी काळे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आरएमएमएस-परेल येथे गौरविण्यात आले.

कबड्डी दिनानिमित्त प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे शालेय कबड्डी खेळाडूंच्या सहभागाने कबड्डी खेळाविषयक मोफत उपक्रम साकारण्यात आला. स्पर्धेमध्ये आर्यन शिंदेने द्वितीय क्रमांक तर रिध्दी दाते व अंजलीशा सकारीया यांनी संयुक्तपणे तृतीय क्रमांक मिळविला. उत्तेजनार्थ पुरस्काराचे मानकरी राज दळवी, आर्या गोरडे व तनया गावंड ठरले. कबड्डी नियम व खेळाबाबत सविस्तर माहिती व उजळणी घेतल्यानंतर कबड्डी नियमांवरील प्रश्नोत्तरांची स्पर्धा पार पडली. परीक्षकाचे कामकाज कबड्डी मार्गदर्शक अविनाश महाडिक व क्रीडा शिक्षिका माधवी कदम यांनी पाहिले. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे शालेय सुपर लीग कबड्डीचा विनाशुल्क प्रशिक्षणासह सहावा हंगाम शालेय कबड्डी संघांच्या सहभागाने येत्या ऑक्टोबरमध्ये सुरु होणार असल्याची माहिती शिवछत्रपती पुरस्कार विजेते संयोजक लीलाधर चव्हाण यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!