ताज्या घडामोडी

१५ व्या राज्यस्तरीय धनगर समाज वधुवर परीचय मेळाव्याचे आयोजन

Spread the love

भारत कवितके मुंबई कांदिवली
पुणे या ठिकाणी धनगर समाज सेवा संघा तर्फे १५ वा राज्यस्तरीय धनगर समाजाचा वधुवर परीचय मेळावा रविवार दिनांक ८ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत रामकृष्ण मंगल कार्यालय ,शिवदत्त नगर,(नवी सांगवी ) ,पिंपळे गुरव,पुणे या ठिकाणी संपन्न होत आहे. असे धनगर समाज सेवा संघाचे अध्यक्ष व संस्थापक मुकुंदराव कुचेकर यांनी पत्रकार व्दारे जाहिर केले आहे. मागच्या दोन वर्षाच्या कोरोना प्रादुर्भाव काळामुळे सदर वधुवर मेळावा आनलाईन व अत्यंत साध्या पध्दतीने घेण्यात आला होता. परंतु या वर्षी मात्र हा वधुवर मेळावा भव्य व दिव्य स्वरुपांत घेण्यात येणार आहे. धनगर समाजातील सर्व पोटजाती मधील धनगर समाज बांधवांनी आपल्या इच्छुक वधुवरांची नावे १० डिसेंबर २०२२ पर्यंत ९६७३८३६८९८ या व्हाट्सएप नंबर वर नोंदणी करावी.नावे नोंदणी सुरु करण्यात आली आहे. आपल्या शिक्षित मुला मुलींना वधुवर निवडी साठी एकमेव मेळावा म्हणजे धनगर समाज सेवा संघाचा असल्याचे संघाचे संचालक दर्शन गुंड ,गणेश लंबाते यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!