ताज्या घडामोडी

मयेकर सिनिअर कॉलेजमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण ठरले लक्षवेधी

Spread the love

तज्ज्ञांच्या प्रात्यक्षिकांमधून झाले मार्गदर्शन
जाकादेवी/ वार्ताहर:-रत्नागिरी तालुक्यातील चाफे येथील मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालयात महाविद्यालयाच्या NCC विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय आपत्ती व्यवस्थापन विभाग रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर अतिशय नियोजनबद्ध व यशस्वीरित्या संपन्न झाले.
कोंकणात नैसर्गिक व मानवी आपत्तीचे प्रमाण वाढले आहे. शासकीय आपत्ती व्यवस्थापन टीम अशावेळी वेळेत घटनास्थळी पोहोचू शकत नाही, त्यावेळी शासनाचे प्रथम मदतगार म्हणून स्थानिक पातळीवर टीम उभी करणे असा उद्देश या प्रशिक्षणामागे आहे ,असे उद्गगार प्रशिक्षक एम. के.म्हात्रे Asst. Deputy controller Civil Defense maharashtra state यांनी काढले. या टीम मध्ये NCC च्या कॅडेट्सना तसेच NSS च्या स्वयंसेवकांना प्राधान्य देऊन त्यांना ५ दिवसाचे प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्रधारक व शासनाचे ओळखपत्र धारक आपत्ती व्यवस्थापक म्हणून समावेश केला जाणार आहे. यावेळी काही प्रात्यक्षिके ही श्री.म्हात्रे यांनी दाखवून बहुमोल मार्गदर्शन केले.
कोणत्याही प्रकारच्या आपत्तीत स्वतःला इजा करून न घेता स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या संसाधनांचा वापर करून आपत्तीत सापडलेल्या आपल्या व समाजातील इतर व्यक्तींना वाचविण्याचे काम छोट्या छोट्या उदाहरणांद्वारे रत्नागिरी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. अजय सूर्यवंशी यांनी अनेक उदाहरणे देत समजावून सांगितले.
शासनाच्या अडचणी व संस्थांच्या अडचणी यांच्यामध्ये समनव्य घडवून आणणाऱ्या GO-NGO आपत्ती व्यवस्थापन सहायक श्रीमती. वैशाली म्हस्के यावेळी उपस्थित होत्या.
आपली स्वतःची एक आपत्ती व्यवस्थापन टीम असावी की जी आपल्या पंचक्रोशीत घडलेल्या आपत्ती वेळी तात्काळ मदतीला हजर असावी अशी टीम तयार करण्याचा मनोदय याआधीच चेअरमन बंधू मयेकर यांनी व्यक्त केला होता. त्याची परिपूर्ती आज होत आहे. या कामी कोणत्याही मदतीला मोहिनी मुरारी शिक्षण संस्था तयार असेल तसेच ही टीम मालगुंड, चाफे, जाकादेवी, काजूर्ली येथेही काम करेल असा विश्वास मोहिनी मुरारी शिक्षण संस्थेचे सचिव, युवा नेते रोहित मयेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दिला.
आपणच आपल्या माणसांना मदत करणार आहोत, त्यांचे प्राण वाचविणार आहोत यापेक्षा दुसरे पुण्याचे कार्य नाही. याचा फायदा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व समाजातील तरुणांनी घ्यावा.याकामी महाविद्यालयातर्फे जी मदत लागेल ती महाविद्यालय करेल असे महाविद्यालयाच्या प्राचार्या स्नेहा पालये यांनी सांगितले.
हा कार्यक्रम जुळवून आणण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेक संघाचे जनकल्याण समितीचे गजानन करमरकर, समीर करमरकर, मंदार जोशी महाविद्यालयाचे उपप्राचार्य मा. श्री. गणेश कुळकर्णी यांनी केले.
या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणामुळे उपस्थित युवक-युवतींमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण होऊन त्यांच्यात आत्मविश्वास वाढल्याचे दिसून आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!