ताज्या घडामोडी

मांडवी मुस्लिम स्पोर्ट्स क्लब अजिंक्य डॉ श्रीधर देशपांडे स्मृती टी २० क्रिकेट स्पर्धा

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

ठाणे : डावातील शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर विजयी धाव घेत मांडवी मुस्लिम स्पोर्ट्स क्लबने एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबचा तब्बल पाच विकेट्सनी पराभव करत स्पोर्टिंग क्लब कमिटी आयोजित डॉ श्रीधर देशपांडे स्मृती टी २० क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.
सेंट्रल मैदानावर रंगलेल्या अंतिम फेरीच्या लढतीत चिन्मय सुतारच्या धडाकेबाज ७३ धावांच्या अर्धशतकी खेळीमुळे एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबने २० षटकात ८ बाद १६४ धावा अशी मजल मारली. सिध्दांत सिंगने ३१ आणि शशिकांत कदमने ३६ धावा केल्या. प्रथमेश डाकेने जबाबदारीपूर्ण गोलंदाजी करताना १७ धावांत सहा फलंदाजांना बाद केले. चेतन पाटील आणि रोनिथ रमेशने प्रत्येकी एक विकेट मिळवली. या लक्ष्याचा पाठलाग करताना कुणकेश पाटील, सुशांत टिळक आणि शिवकुमार चौहानने चिवट फलंदाजी करत संघाला विजयाच्या नजीक नेले. पण एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत सामन्यात रंगत निर्माण केली. पण मांडवी मुस्लिमच्या फलंदाजांनी संयमी खेळ करत शेवटच्या षटकात पाच फलंदाजांच्या मोबदल्यात १६५ धावांनिशी विजेतेपद निश्चित केले. कुणकेशने ६०, सुशांतने ४४ आणि शिवकुमारने ३३ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. नंदन कामतने ४१ धावांत ३ आणि शशिकांत कामतने एक विकेट मिळवली.

संक्षिप्त धावफलक: एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब : २० षटकात ८ बाद १६४ ( चिन्मय सुतार ७३, सिध्दांत सिंग ३१, शशिकांत कदम ३६, प्रथमेश डाके ४-१७-६, चेतन पाटील ३-२९-१, रोनिथ रमेश १-२-१) पराभूत विरुद्ध मांडवी मुस्लिम स्पोर्ट्स क्लब : १९.५ षटकात ५ बाद १६५ ( कुणकेश पाटील ६०, सुशांत टिळक ४४ , शिवकुमार चौहान ३३, नंदन कामत ४-४१-३, शशिकांत कदम ३.५-३९ -१)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!