ताज्या घडामोडी

पाडळ्से धरण जनांदोलण समितीचे मुख्यमंत्री यानां निवेदन

Spread the love

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधि एस् एम पाटील

पाडळसे धरण,प्रधान मंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्यात येऊन प्रकल्प त्वरित पूर्ण करा-अन्यथा तीव्र आंदोलन समितीने दिला ईशारा* अमळनेर( )पाडळसे प्रकल्प केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करावा बंद असलेले धरनाचे काम युद्ध पातळीवर सुरु करावे या मागणीची नोटीस पाडळसे धरण जनआंदोलन समितीच्यावतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचेसह संबंधित अधिकारी यांना देण्यात आली असून १५ दिवसात याबाबत योग्य ती कार्यवाही सुरू न केल्यास अमळनेर सह ६ तालुक्यातील जनतेला घेऊन पाडळसे धरण जनआंदोलन समिती तिव्र आंदोलन छेडेल असा स्पष्ट इशारा समितीच्यावतीने नोटीसीद्वारे देण्यात आलेला आहे. दरम्यान २०१९ ला तत्कालीन मुख्यमंत्री यांना काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केल्याप्रकरणी मा.न्यायालयाने ६ आंदोलनकर्त्याना आज जामीन मंजूर केला.
पाडळसे धरणासाठी युतीच्या काळात मुख्यमंत्री असतांना ना.देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी जाहीर केलेला पंधराशे कोटीचा निधी तातडीने द्यावा. दोन्ही टप्प्यांचे सुधारित इस्टिमेट तयार करून राज्य शासनाच्या स्तरावरील जळगाव , नाशिक, मुंबई संबंधित सर्व कार्यालयाच्या पातळीवरील मान्यता मिळवून मंत्रिमंडळाच्या सुधारित प्रशासकीय मान्यता द्यावी व राज्य सरकारच्या योग्य त्या शिफारशीसह सदरचा प्रकल्प केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये समाविष्ट करावा. सद्यस्थितीत बंदसदृश्य अवस्थेत असलेले धरण बांधकाम तातडीने युद्ध पातळीवर धरणाच्या कामास सुरुवात करावी या मागणीची नोटीस पाडळसे धरण जनआंदोलन समितीच्यावतीने राज्यकर्त्यांना इमेल,प्रत्यक्ष देण्यात आली असून १५ दिवसात याबाबत योग्य ती कार्यवाही सुरू न केल्यास अमळनेर, चोपडा, पारोळा,धरणगाव, धुळे,शिंदखेडा या ६ तालुक्यातील जनतेला घेऊन पाडळसे धरण जनआंदोलन समिती तिव्र आंदोलन छेडेल असा इशारा समितीच्यावतीने नोटीसीद्वारे मा.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंपदामंत्री,जलसंपदा सचिव, जळगांव पालकमंत्री, जळगांव लोकसभा मतदारसंघाचे खासदार,आ.अनिल पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, मा.आ.स्मिता वाघ यांचेसह ,मुख्य अभियंता, तापी खोरे विकास महामंडळ, कार्यकारी अभियंता,निम्न्न तापी प्रकल्प, देण्यात आलेला आहे.

६ आंदोलनकर्त्याना जामीन
दरम्यान पाडळसे धरण जन आंदोलन समितीचेवतीने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अमळनेर येथे दौऱ्यावर आले असता ‘धरणाचे काम जलदगतीने व्हावे’ या मागणीसाठी आंदोलकानी काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी करीत आंदोलन केले होते.सदर प्रकरणी आंदोलक शिवाजीराव पाटील, सुभाष चौधरी , रणजित शिंदे , संजय पाटील, महेश पाटील, अजयसिंग पाटील,
देविदास पाटील ,दयाराम पाटील, सुनिल पाटील, रविंद्र पाटील, रामराव पवार, नामदेव पाटील,सतिष काटे, सतीश पाटील आदिं १४ आंदोलकांवर कलम १४३,१८८अन्वये दाखल गुन्ह्यातील आरोपीपैकी समन्स बजावण्यात आलेल्या ६ आंदोलनकर्त्यांना आज मा.प्रथम न्यायदंडाधिकारी अमळनेर यांचे कोर्टात सुनावणी होऊन त्याकामी मे श्रीमती जोंधळे मॅडम यांनी जामीन मंजूर केला आहे.सदर कामी आंदोलन कर्त्यांच्यावतीने पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे कायदेशीर सल्लागार ऍड.दिनेश पाटील यांनी कामकाज पाहिले.पुढील सुनावणी १६ फेब्रुवारी २०२३ ला ठेवण्यात आलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!