सागाव वारणा विद्यालय व ज्युनिअर काँलेज(कला), सागाव येथे प्रजासत्ताक दिन साजरा.
शिराळा प्रतिनिधी
याप्रसंगी मा.श्री.चंद्रकांत दादा पाटील.
अध्यक्ष : श्री.भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी सागाव
मा.श्री.शामराव बाबूराव पाटील. संचालक वारणा सहकारी साखर कारखाना वारणानगर,श्री.बाबासाहेब केशव पाटीलसंचालक:विश्वास सहकारी साखर कारखाना, यशवंतनगर, चिखली,श्री.विराज महादेव पवार S.S.R.Indian Nevi,श्री.संजय तिके.
माजी सैनिक भारत सरकार श्री.सत्यजित अशोकराव पाटील.उपसरपंच सागाव तसेच भैरवनाथ ग्रुपमधील सर्व संस्था पदाधिकारी, वारणा विद्यालय व ज्युनिअर काँलेज, सागाव चे मुख्याध्यापक, मा.श्री.सदावर्ते सर,
शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.
आज मा.श्री.संजय तिके माजी सैनिक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी मा.श्री.शामराव बाबूराव पाटील. यांची वारणा सहकारी साखर कारखाना संचालक पदी निवड झाले बद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक सदावर्ते सर यांचे हस्ते त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
तसेच ,मा.श्री.बाबासाहेब केशव पाटील विश्वास सहकारी साखर कारखाना चिखली येथे संचालक पदी निवड झाले बद्दल त्यांचा सत्कार आमच्या संस्थेचे अध्यक्ष व माजी सभापती पंचायत समिती शिराळा या़ंचे हस्ते संपन्न झाला.तसेच मा.श्री.विराज महादेव पवार. यांचा सत्कार भैरवनाथ ग्रुपचे कार्याध्यक्ष व सागावचे उपसरपंच मा.श्री.सत्यजित अशोकराव पाटील. यांचे शुभ हस्ते संपन्न झाला.
मा.श्री.संजय तिके.माजी सैनिक यांचे स्वागत आमच्या संस्थेचे खजिनदार मा.श्री.विलास राजाराम पाटील यांनी केले.शेवटी सर्व उपस्थितांचेआभार विजयकुमार पाटील सर यांनी मानले.सूत्रसंचलन सचिनकुमार इंगवले सर यांनी केले.सर्व मान्यवर ,शिक्षकवृंद कर्मचारी विद्यार्थी व पालक कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करत उपस्थित होते.