ताज्या घडामोडी

प्रा. सचिन शिंदे यांना पीएचडी पदवी प्रदान

Spread the love

सांगोला/ प्रतिनिधी
प्रा.सचिन शिंदे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कडून नुकतीच प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती आणि पुरातन शास्त्र विषयात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी सांगली जिल्ह्यातील शिल्पकला आणि मंदिर वास्तुकला या विषयावर पूर्णवेळ संशोधन कार्य केले आहे. मार्गदर्शक म्हणून विभाग प्रमुख प्रा. डॉ.माया पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. यासाठी डॉ. डी एस तिकटे व बहिस्थ परीक्षक म्हणून डॉ. विजय साठे यांनी काम पाहिले. सध्या ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे अध्यापनाचे कार्य करीत आहेत .त्यांच्या यशाबद्दल सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक प्रा. डॉ.गौतम कांबळे, विभाग प्रमुख डॉ.माया पाटील ,डॉ. प्रभाकर कोळेकर ,डॉ.रवींद्र चिंचोळकर, डॉ.प्रकाश व्हनकडे यांनी प्रा. सचिन शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!