ताज्या घडामोडी

संख्याशास्त्राला ‘अच्छे’ दिन : प्रा. अर्चना मोरे

Spread the love

पी.व्ही.पी. महाविद्यालयात ‘क्विझ स्पर्धा’ व अतिथी व्याख्यान संपन्न
कवठेमहांकाळ : प्रतिनिधी
(दि. ६) येथील पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालया मध्ये ‘शिवाजी विद्यापीठ संखाशास्त्र शिक्षक संघटना’ (SUSTA) च्या वतीने बेसिक स्टेटीस्टीक्स क्विझ परीक्षा घेणेत आली. सांख्यिकीमधील सखोल ज्ञानासाठी तसेच विविध स्पर्धा परीक्षा आणि विद्यापीठ परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणाऱ्या या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. सदर परीक्षेसाठी कै. आर.आर.पाटील महाविद्यालय सावळज येथील संख्याशास्त्राच्या प्राध्यापिका अर्चना मोरे बहिस्थ परीक्षक आणि अतिथी व्याख्यात्या म्हणून उपस्थित होत्या. प्रा. मोरे यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन पंकज गुरव या विद्यार्थ्याने केले. प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख प्रा. विजय कोष्टी यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. अभिलाष पाटील यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. मोरे यांनी येणाऱ्या काळात आकडेवारीचे महत्व वाढणार असून संख्याशास्त्राच्या अभ्यासाची उपयुक्तता दिवसेंदिवस वाढणार असल्याचे स्पष्ट केले. भविष्यात संख्याशास्त्रज्ञांची मागणी वाढणार असून संख्याशास्त्राला ‘अच्छे’ दिन येणार असल्याने विद्यार्थ्यांना ‘या विषयाचा मन लावून अभ्यास करा यश तुमचेच आहे’ असे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले. संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, सचिव सुदर्शन शिंदे, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एम. के. पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. विजय कोष्टी व प्रा. अभिलाष पाटील यांनी सदर परीक्षेचे नियोजन केले या व्याख्यानाचा ग्रामीण भागातील या महाविद्यालयात शिक्षण घेत असणाऱ्या आणि प्रशासकीय, शैक्षणिक, संरक्षण, बँकिग आदी विविध क्षेत्रांत करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याना निश्चीत्तच लाभ होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!