ताज्या घडामोडी

अखिल महाराष्ट्र कोष्टी समाज परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ संपन्न

Spread the love

नागपूर
अखिल महाराष्ट्र कोष्टी समाज परिषदेच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा एकत्रित पदग्रहण समारंभ नागपूर येथील श्री लक्ष्मीनारायण सभागृह, स्नेह नगर नागपूर या ठिकाणी शनिवार दिनांक 11 फेब्रुवारी 2023 रोजी प्रचंड प्रतिसादात संपन्न झाला• सर्व पदाधिकाऱ्यांना राष्ट्रीय अध्यक्ष श्री अरुण भाऊ वरुडे यांनी शपथ देऊन संघटनेच्या कार्याची माहिती दिली• कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अखिल महाराष्ट्र कोष्टी समाज परिषदेचे राज्य अध्यक्ष श्री सतीश दाभाडे उपस्थित होते• यावेळी व्यासपीठावर महिला संघटनेच्या अध्यक्ष सौ मंदाकिनीताई टकले, राज्य युवा अध्यक्ष श्री विजय कलडोने, परिषदेचे महासचिव श्री रमेशजी घट्टे, राष्ट्रीय महासचिव श्री नारायण राव वडे, राष्ट्रीय सचिव श्री उमेशजी ढगे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्री पंडितराव इदाते, राज्य कोषाध्यक्ष श्री विष्णू भाऊ कुटे, इचलकरंजी येथील देवांग समाजाचे अध्यक्ष श्री विश्वनाथ जी मुसळे, कार्यकारी संचालक श्री रविंद्रजी वरुडे, प्रोफेशनल ग्रुपचे राज्य अध्यक्ष श्री लाटणे साहेब इत्यादी मान्यवर उपस्थित होते• सर्व पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ झाल्यानंतर विदर्भातील एकूण 15 कर्तृत्ववान व्यक्तींचा शाल, श्रीफळ, आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला••• सोबतच विदर्भातीलच एकूण 12 मरणोत्तर कर्तुत्ववान व्यक्तीचा मरणोत्तर जीवनगौरव म्हणून सन्मान करण्यात आला• कार्यक्रमास इचलकरंजी येथील ज्येष्ठ समाज बंधू, प्रसिद्ध वीजतज्ञ, जनता दलाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय श्री प्रतापराव होगाडे, स पत्नी उपस्थित होते• विदर्भ कोष्टी हितकारणी मंडळाच्या वतीने अध्यक्ष श्री गजाननराव धोपे यांनी राष्ट्रीय अध्यक्ष श्री अरुण भाऊ वरोडे, विज तज्ञ श्री प्रतापराव होगाडे, इचलकरंजी येथील उद्योजक श्री विश्वनाथ जी मुसळे, पुणे येथील देवांग समाजाचे अध्यक्ष श्री सुरेश राव तावरे, आणि इचलकरंजी येथील राज्य संघटक श्री संजय कांबळे यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला• कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौ अंजलीताई खोडवे, सुनिता दाभाडे, सो मंजुषा ताई गोरख, अंजलीताई शिंगारे आणि सौ कल्याणी धोपे, यांनी गणेश वंदना सादर केली• कार्यक्रमाचे सुरेख संचालन उपरोक्त महिलांनी केले• श्री बाळासाहेब दिवटे यांचा वाढदिवसही याच कार्यक्रमात साजरा करण्यात आला, सोबतच नागपूर येथील श्री विलास गोरख यांचे चिरंजीव यांनी जे डबल इ मध्ये यश मिळविल्याबद्दल परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला• यावेळी मुख्य दक्षता अधिकारी डब्लू सी एल श्री अजय म्हेत्रे, प्रसिद्ध उद्योजक श्री राजूभाऊ निवल, यवतमाळ तसेच सो गीता ताई हिंगे, गडचिरोली यांनी मनोगत व्यक्त केले• आदरणीय श्री प्रतापराव होगाडे यांनी सुद्धा मार्गदर्शन करून परिषदेस सहकार्य करण्याचे आश्वासन दिले• या कार्यक्रमांमध्ये पवनी येथील माजी नगराध्यक्ष डॉक्टर प्रकाश देशकर, अकोला येथील डॉक्टर सुभाष हाते, मुंबई येथील श्री संजय म्हेत्रे, भंडारा येथील डॉक्टर मिलिंद देशकर, भंडारा येथील शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री प्रशांत देशकर, अमरावती येथील श्री रवींद्र बोरीकर, मुंबई येथील अध्यक्ष श्री अरुण जी हांडे, उमरखेड येथील श्री दिलीपराव भंडारे, श्री राजूभाऊ निवल, आर्णी येथील श्री वसंतराव राऊत, धारवा येथील श्री विलास भड, श्री सुधीर अलोने, डॉक्टर संजय तिडके, अकोला परिषदेचे अध्यक्ष श्री प्रशांत उकंडे, श्री शशिकांत धोपे, श्री कैलास थोटे, युवा अध्यक्ष सूर्यकांत हो रे, कारंजा येथील किनीकर बंधू, दिग्रस येथील श्री चंद्रशेखर नवरे, महिला अध्यक्षा तसेच युवा अध्यक्ष, ह भ प, श्री सुधाकर राव किनीकर, अकोला येथील श्री प्रफुल्ल जुमळे, सौ उल्काताई निमजे, यवतमाळ अर्बन बँकेच्या संचालिका शीलाताई नेर येथील श्री सतीश राव आगे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते•• त्यासोबतच महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेले असंख्य पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते••• उपस्थित पाहुण्यांची तसेच बाहेरून आलेल्या मान्यवरांची भोजन व निवास व्यवस्था श्री विलास गोरख आणि श्री कुणाल उर्फ बंटी झंझाड, यांनी उत्कृष्टपणे पार पाडली• कार्यक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी श्री प्रदीप आगे, श्री विनोद आगे, डॉक्टर राजेश शिंगारे, श्री राजेंद्र पाटील, श्री रवी जुमळे, श्री नरेंद्र माहुरे, श्री अशोकराव बोरीकर, श्री अनिल दवंडे, श्री उकंडे बंधू, श्री तुषार खोडवे, श्री विनोद डाळ, मेहुल धोपे, श्री कुणाल गोरख, ज्येष्ठ कार्यकर्ते श्री प्रल्हाद बोरीकर, श्री राम की निकर, श्री भरत आलोने, श्री सुशील हिंगे, श्री स्वानंद देशकर, सौ कल्याणी धोपे, ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या श्रीमती सविता ताई नेवारे, सौ सविता ताई धोपे, कुमारी श्यामली दाभाडे, सो पाटील ताई, सौ बोरीकर सौ आगे ताई, कुमारी गोरख, सौ दर्शना गोरख, सौ आशाताई आगे, सौ उकंडे ताई, यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला• ज्या कर्तुत्ववान व्यक्तींचा विशेष सन्मान करण्यात आला त्यांचे संपूर्ण कुटुंबीय तसेच मरणोत्तर जीवन गौरव सन्मान ज्यांचा करण्यात आला त्यांचे निकटचे नातेवाईक सन्मान स्वीकारण्यासाठी उपस्थित होते• अध्यक्षीय भाषण श्री सतीश दाभाडे, राज्य अध्यक्ष यांनी करून, आभार प्रदर्शन श्री प्रदीप जी आगे, विदर्भ कोष्टी हितकारणी मंडळ यांनी केले• कार्यक्रमाच्या शेवटी सूरताल समूहातील उपस्थित कलावंतांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला• सर्व उपस्थित पाहुण्यांसाठी आणि समाज बंधूंसाठी रुचकर भोजनाची व्यवस्था ही करण्यात आली होती• जवळजवळ 500 समाज बंधू आणि भगिनी पदाधिकाऱ्यांसह कार्यक्रमास उपस्थित होते•

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!