ताज्या घडामोडी

मुंबई मध्ये ” यशवंतराव होळकर जन्मोत्सवाचे” आयोजन

Spread the love

भारत कवितके मुंबई कांदिवली
पुण्यश्लोक फाऊंडेशन महाराष्ट्र व्दारा भारताचे पहिले स्वातंत्र्य सेनानी चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जन्मोत्सवाचे आयोजन मंगळवार दिनांक १३ डिंसेबर २०२२ रोजी मुंबई मंत्रालयाजवळील यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी दुपारी ३ वाजता करण्यात आलेले आहे. इंग्रजांविरुद्ध सातत्याने अठरा पेक्षा जास्त लढाया जिंकणारे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर स्वत:चा वैदिक पध्दतीने राज्याभिषेक करुन घेणारे एकमेव यौध्दा म्हणून इतिहासांत सुवर्ण अ‌क्षरात लिहीलेले नाव म्हणजेच चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर होय.या प्रसंगी धनगर समाजातील आजी माजी मंत्री, आमदार, नेते,संस्था,संघटना, व त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित राहणार आहेत,मुंबई नगरीच्या प्रशासकीय, सांस्कृतिक, औद्योगीक, आर्थिक, राजकिय, सामाजीक, कला,क्रीडा,साहित्य आदि क्षेत्रातील उल्लेखनिय मोलाचे योगदान देणाऱ्या सुपुत्रांचा मान्यवरांच्या हस्ते ” मुंबई भूषण”हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. या प्रसंगी धनगर समाजातील बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे.असे आवाहन पुण्यश्लोक फाऊंडेशन चे अध्यक्ष व धनगर माझा चे संपादक धनंजय तानले व संयोजक कमिटीतील एन.बी.मोटे,अनिल राऊत,डा.झुंजारराव बदडे,ज्ञानेश्वर परदेसी व नाना राजगे यांनी केले आहे.
भारत कवितके मुंबई कांदिवली 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!