ताज्या घडामोडी

गणेशोत्सव उत्साहाने परंतु कायद्याचे पालन करत साजरा करा.

Spread the love

शिराळा: प्रतिनिधी

ध्वनिप्रदूषण होऊ नये यासाठी पारंपरिक वाद्यांचा वापर जास्तीत जास्त करावा. डॉल्बीच्या डेसिबल मर्यादेचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे.असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा डुबल यांनी केले. त्या शिराळा पोलिस ठाण्यामार्फत गणेशोत्सव मार्गदर्शक बैठकीत बोलत होत्या.
यावेळी शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार, कोकरुड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, कुरळप पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक जाधव, मुख्याधिकारी योगेश पाटील, नायब तहसीलदार अरुण कोकाटे, सहायक गटविकास अधिकारी अरविंद माने, सहायक पोलिस निरीक्षक अविनाश वाडेकर, वीज वितरणचे प्रल्हाद बुचडे हे प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमास शिराळा, कोकरुड व कुरळप पोलिस ठाण्याअंतर्गत येणार्या गावातील गणेश मंडळांचे अध्यक्ष उपाध्यक्ष, सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील यांना निमंत्रित करण्यात आले होते.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा डुबल म्हणाल्या, गेली दोन वर्षे सर्व सार्वजनिक सणासुदीवर निर्बंध आले होते. दोन वर्षांनंतर आपणं गणेशोत्सव सण साजरा करत आहे ही आनंदाची बाब आहे. हा सण उत्साहाने परंतु कायद्याचे पालन करत साजरा करा. गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषण होऊ नये यासाठी पारंपरिक वाद्यांचा वापर जास्तीत जास्त करावा. डॉल्बीच्या डेसिबल मर्यादेचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे. आपणं देशाचे सुजाण नागरिक आहोत वृक्षारोपन, रक्तदान शिबिर, ईपीक नोंदनी, मतदार नोंदणी, आधार कार्ड नोंदणी आदी विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन केल्यास समाज घटकांना यांचा लाभ होईल. तसेच समाज प्रबोधन करणार्या देखाव्यावर भर द्यावा ‌‌
निवडणूक आयोगाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त अनेक स्पर्धांचे आयोजन केले जाते यांमध्ये विविध सामाजिक विषय व उपक्रम असतात. याची माहिती संबंधित पोलिस पाटील व ग्रामपंचायती कडून घ्यावी. चांगल्या कामासाठी पोलिस प्रशासन सदैव आपल्या पाठीशी आहे. सणाचे पावित्र्य राखा गैरप्रकार दिसून आल्यास किंवा नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे. काही अडचण आल्यास ११२नंबर डायल करावा पोलिस प्रशासन सज्ज आहे. वीज वितरणच्या अधिकार्यांनी लोकांच्या अडचणी सोडवाव्यात. तसेच गणेश मंडळांनी
तर पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार म्हणाले, गणेशोत्सव हा सर्वांचा धार्मिक सण असून तो सर्वांनी धार्मिक पद्धतीने साजरा करावा ‌‌गणेशोत्सव साजरा करताना नियमांचे पालन करा. काही अडचण आल्यास ११२ नंबर डायल करा. तसेच सर्वांनी इतर धर्मियांच्या भावना सांभाळत हा धार्मिक सण धार्मिक भावनेने साजरा करावा. तसेच सर्वांनी ऑनलाईन परवाने दिले घेणे बंधनकारक आहे.परवाण्यात दिलेल्या नियमांची पालन करुन गणेशोत्सव साजरा करण्यात यावा. मंडपात चोवीस तास एका तरी सदस्याने थांबले गरजेचे आहे.
तसेच मुख्याधिकारी योगेश पाटील म्हणाले, २०२०/२१ या दोन वर्षांमध्ये सर्व धार्मिक सणांवर बंधने आली होती. दोन वर्षांमध्ये आलेल्या बंधनांना शासनाने शिथिलता दिली आहे. गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषण, जलप्रदूषण प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करू नये.कायद्याचे पालन करत गणेशोत्सव साजरा करावा.प्रत्येक मंडळाने परवाने घेणे गरजेचे आहे.मंडप घालताना रस्त्यावर रहदारीला अडथळा निर्माण होऊ नये याची खबरदारी घ्यावी. गणेश मंडळांचे मंडप व मिरवणूकीचे ट्रॅक्टरची सजावट करताना विद्युत वितरणच्या तारांपासून धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
यावेळी सहायक गटविकास अधिकारी अरविंद माने, नायब तहसीलदार अरुण कोकाटे, कुरळप पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक जाधव, वीज वितरणचे प्रल्हाद बुचडे यांनी मनोगत व्यक्त केले.
आभार सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांनी मानले.
________________________________________

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!