ताज्या घडामोडी

महिला व मुलींना आत्मनिर्भर,खंबीर,नारीशक्ती बनविण्यासाठी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण – मुख्याधिकारी तथा प्रशासक योगेश पाटील.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी – २१व्या शतकातील प्रगतीच्या वाटेवर चालण्याचा ध्यास घेणाऱ्या व आपल्या कार्यकर्तृत्वाने स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण कराण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या महिलांना एक वेगळी दिशा व एक वेगळे लक्ष मिळवून देत समाजाला एका विचारप्रणालीचा पाया घालून देण्याच्या हेतूने शिराळा नगरपंचायतचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. योगेश बाळकृष्ण पाटील यांच्या संकल्पनेतून शहरातील महिला व मुलींना आत्मनिर्भर व खंबीर व नेतृत्वशाली बनवण्यासाठी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देऊन त्यांना एक खंबीर व आत्मनिर्भर नारीशक्ती बनवण्याच्या उद्देशाने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधत महिला व बालकल्याण निधी अंतर्गत मार्शल आर्ट (कराटे) प्रशिक्षणाची सुरु करण्यात आले. शहरातील वय वर्षे ८ ते १६ या वयोगटातील मुलींसाठी 3 महिने कालावधीसाठीचा येलो बेल्ट मार्शल आर्ट (कराटे) चे निःशुल्क प्रशिक्षण आयोजन मुलींच्या सोयीसाठी संत नामदेव मंदिर व सदगुरू आश्रम शाळा येथे सुरु करण्यात आले. दिनांक २३/०१/२०२३ रोजी प्रत्यक्ष प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ शिराळा नगरपंचायत चे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. योगेश बाळकृष्ण पाटील यांच्या हस्ते शहरातील सदगुरू प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत सायंकाळी करण्यात आला. यावेळी प्रशासकांनी या प्रशिक्षणात सहभाग नोंदवणाऱ्या मुलींचे कौतुक करत त्यांच्या भविष्यात डोकाऊ पाहणाऱ्या अडीअडचणी व संकटावर मात करण्यासाठी स्वत:ला सक्षम बनवण्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी खंबीर व कर्तृत्ववान व गौरवशाली वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच पुढील बेल्ट परीक्षेचे (ऑरेंज बेल्ट ) चे प्रशिक्षण सुद्धा निःशुल्क उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. तसेच प्रशिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी आवश्यक असणारा गणवेशही उपलब्ध करून देणार असल्याचे जाहीर केले. प्रशिक्षक म्हणून श्री. नागनाथ घाटगे हे काम पाहत आहेत. सदगुरू आश्रम शाळेतील शिक्षक श्री. विलास निकम व श्री. रियाज अत्तार यांनी या प्रशिक्षणाबद्दल प्रशासकांचे आभार मानत प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींच्या वतीने प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करण्याची ग्वाही यावेळी दिली. या शुभारंभ कार्यक्रमास शिराळा नगरपंचायत चे अधिकारी – कर्मचारी, सदगुरू आश्रम शाळेतील शिक्षक वर्ग व प्रशिक्षणार्थी मुली उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!