ताज्या घडामोडी
शिष्यवृत्ती परीक्षेत वरवडे विद्यालयाची आर्या बोरकर जिल्ह्यात प्रविण्य प्राप्त
माध्यमिक विद्यालय वरवडे येथील सन 2022मध्ये झालेल्या इयत्ता 8 वी मधील शिष्यवृत्तीमध्ये जिल्ह्यात 103 क्रमांक मिळउन उत्तम प्रावीण्य प्राप्त केले.शासकीय होणाऱ्या या परीक्षेत ग्रामीण भागातील तिचे हे यश इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणादायी आहे.तिच्या या यशात शिक्षकांबरोबर तिचे आई वडील यांचाही वाटा आहे.तिला राजेश जाधव सर,प्रशांत विचारे, वृषाली गराडे,शारदा पवार,सुहास कुंभार,मनोज महाडिक,देवयानी कदम यांचे मार्गदर्शन लाभले.तिचे पुष्प देऊन कौतुक करून विद्यार्थी व शिक्षक यांनी अभिनंदन केले,भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.