ताज्या घडामोडी

नवतरुण मंडळ पेढांबे भराडे तर्फे सेवनिवृत्त पोस्टमास्तर श्री.चंद्रकांत दाभिळकर यांचा यथोचित सत्कार

Spread the love

प्रदीर्घ सरकारी सेवेनंतर पुढील आयुष्य समाजप्रती देणार असे भावनिक उदगार

चिपळूण:-(योगेश पेढांबकर)
नवतरुण मंडळ पेढांबे- भराडे तर्फे नुकताच सेवानिवृत्त हेड ऑफिस पोस्ट मास्तर *श्री.चंद्रकांत बाळू दाभिलकर* नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.यानिमित्त नवतरुण मंडळ पेढांबे-भराडे मंडळामार्फत नवतरुण मंडळाचे माजी अध्यक्ष श्री.दिपाजी मुंढेकर, निवृत्त पोलीस जमादार श्री.जानू पेढांबकर, मंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्री.मनोहर मुंढेकर ,उपाध्यक्ष श्री.रामदास सावर्डेकर, ग्रामपंचायत पेढांबे-बिनविरोध सदस्य श्री.समीर पेढांबकर,सेक्रेटरी श्री. रमेश उबळेकर,खजिनदार योगेश पेढांबकर,भगवान पेढांबकर,स्वप्नील पेढांबकर,सुभाष दयाळकर आदी मान्यवरांच्या उपस्थित मध्ये यथोचित शाल,श्रीफळ,बुके देऊन सत्कार व शुभेच्छा देण्यात आल्या.
हेड पोस्टमस्तार श्री.चंद्रकांत बाळू दाभिलकर यांनी ७ मार्च १९८१ साली भारतीय डाक विभागात नोकरीला सुरुवात केली.हेड ऑफिस मध्ये पोस्टमास्तर या पदावर ४० वर्षे ८ महिने अशी प्रदीर्घ सेवा प्रामाणिकपणे बजावली. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सेवा बजावत असताना भारतीय डाक विभागात एक आदर्श अधिकारी कसा असावा. याविषयी अनेक बाबी यांच्या कामातून व कर्तुत्वातुन दिसून येत. दुर्गम भागात नोकरी करीत असताना कधीही कामावर उशिरा गेले नाहीत. वेळेला महत्व देत सर्व कर्मचारी यांना आपल्या कौशल्यातून वेळ किती महत्वाची असते याचे मूर्तिमंत उदाहरण कृतीतून त्यांच्या दिसून येत होते.
नवतरुण मंडळ पेढांबे-भराडे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री.एस.बी.पेढांबकर साहेब यांनी गुजरात वरून फोनद्वारे शुभेच्छा संदेश दिल्या.व भावनिक उदगार काढले. तरुण मंडळ पेढांबे भराडे चे सर्वेसर्वा व सामाजिक कार्यकर्ते श्री.जी.बी.पेढांबकर साहेब यांचे पहिल्यापासून दाभिलकर यांच्यावर प्रेम, प्रदीर्घ सेवेनंतर आजपर्यंत सरकारी सेवा उत्तम पार पाडलीत. जसे सेवेत असताना समाजसेवा केली तसेच पुढील आयुष्य समाजप्रती द्यावा आणि देणार असा विश्वास दिला. व शुभेच्छा दिल्या.
सेवानिवृत्त श्री.चंद्रकांत दाभिलकर यांनी मनोगत व्यक्त करताना मी लहानाचा मोठा इथेच झालो आई- वडिलांच्या आशिर्वाद यामुळेच मी इथपर्यंत पोहचू शकलो. आपण माझा सन्मान केलात हा सन्मान मी कधीही विसरू शकत नाही.असे उद्गगार काढले. परिवारामध्ये पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी ,जावई ,नातवंडे असा मोठा परिवार आहे.सामाजिक कार्यकर्ते व मंडळाचे सल्लागार सध्या स्थायिक पुणे येथे असून श्री.प्रदीप मुंढेकर यांनी फोनद्वारे श्री.दाभिलकर यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमप्रसंगी व तरुण मंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्री.मनोहर मुंढेकर यांनी सत्कारमूर्ती यांच्या जीवनप्रवास यावर अचूक वेध घेतले.व शुभेच्छा दिल्या.नियोजित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मंडळाचे खजिनदार श्री योगेश पेढांबकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!