ताज्या घडामोडी

संविधानाप्रमाणे देशाचा कारभार केल्याने देश प्रगतीपथावर पोहोचला -गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर

Spread the love

शिराळा प्रतिनिधी
संविधानाप्रमाणे देशाचा कारभार केल्याने आपला भारत देश प्रगतीपथावर पोहोचला आहे, असे प्रतिपादन शिराळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी  प्रदीपकुमार कुडाळकर यांनी केले.
जिल्हा परिषद शाळा सिद्धार्थनगर आरळा येथे आयोजित भारतीय संविधान दिनानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आरळा केंद्राच्या केंद्रप्रमुख मधुवंती धर्माधिकारी होत्या.
खुजगाव शाळेचे मुख्याध्यापक दीपक रोकडे, मुख्याध्यापक मोहन पवार, लताराणी पाटील, आशा माळी, अध्यक्षा नेत्रा झाडे, ग्रामपंचायत सदस्या जयाबाई कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ते पुढे म्हणाले की, प्रत्येक बालकाने संविधानाप्रमाणे आपल्या वर्तनातून सर्व मूल्यांची रुजवण केल्यास भारत देश बलवान होईल व देशाच्या प्रगतीला मदत होईल.
यावेळी दीपक रोकडे म्हणाले, प्रत्येक बालकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यतून प्रेरणा घेऊन काम केल्यास निश्चितच जीवनाचा कायापालट होईल .यावेळी शाळेत घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा यांची पाहणी मान्यवरांनी केली. शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.यावेळी मुख्याध्यापक मोहन पवार यांनी भारतीय संविधानाचे वाचन केले.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक मोहन पवार यांनी केले तर आभार शिक्षिका लतारानी पाटील यांनी मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!